जमिनीवर झोपण्याचे आहेत भरपूर फायदे, तुम्हालाही लागेल सुखाची झोप...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 03:44 PM2023-09-11T15:44:06+5:302023-09-11T16:02:07+5:30

दिवसभराची कामं संपवून घरी आल्यावर कधी एकदा झोपतोय असं प्रत्येकालाच वाटतं

Benefits of Sleeping on Floor : दिवसभर काम करून थकून-भागून घरी आल्यावर सुखाची झोप मिळावी अशी साऱ्यांचीच इच्छा असते. अशा वेळी मऊसर गादी असावी असं अनेकांना वाटतं.

गादीवर झोप छान लागते यात वादच नाही, पण जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया, त्याबद्दल...

कमरेच्या दुखण्यापासून सुटका - जमिनीवर झोपल्याने कंबर आणि कमरेखालच्या भागाला आराम मिळतो. शरीर एका सरळ रेषेत राहते आणि त्यामुळे सकाळी तुम्हाला स्फूर्ती जाणवते.

स्पॉन्डिलायटिस पासून आराम - ज्या लोकांना मानेची दुखणी आहेत, त्यांनी जमिनीवर उशी न घेता झोपावे. त्यामुळे मानेच्या स्नायूंना आराम मिळतो आणि दुखणं कमी होतं.

गारवा जाणवतो - दिवसेंदिवस तापमान वाढ होत आहे. अशातच उन्हाळ्यात जमिनीवर झोपल्याने शरीराला गारवा मिळतो आणि सुखाची झोप मिळते.

तणावापासून मुक्ती - रात्रीच्या वेळी जमिनीवर झोपल्याचा ब्रेन हेल्थ साठी चांगला फायदा होतो आणि तणावापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

रक्त प्रवाह सुरळीत होतो - जमिनीवर झोपल्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो. त्याचा पर्यायाने हृदयावर आणि मेंदूवरही सकारात्मक परिणाम होतो.