सदाफुलीचे औषधी गुणधर्म जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 03:58 PM2018-11-13T15:58:36+5:302018-11-13T16:16:40+5:30

सदाफुलीमध्ये विन्डोलिन (vindolin) नावाचं तत्त्व आहे. ज्यामध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्याचे गुणधर्म आहे.

मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत : तीन कप पाण्यामध्ये सदाफुलीची 15-16 पानं उकळून घ्या. या पाण्याचं दिवसातून दोनवेळा सेवन करा. पण बराच वेळ ठेवलेले पाण्याचं सेवन करू नका. नियमित स्वच्छ आणि ताजचं पाणी प्या.

मुतखड्यावर प्रभावी : सदाफुलीची मूठभर पानं घ्या आणि तीन कप पाण्यात उकळा. हे पाणी दिवसातून दोनदा प्या.

यामध्ये असणारे vinblastine आणि vincristine तत्व कॅन्सरविरोधात लढण्यास मदत करतात