पेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 12:06 PM2018-11-17T12:06:06+5:302018-11-17T12:14:29+5:30

नेहमीच शारीरिक मेहनत केल्यानंतर शरीराच्या एखाद्या भागात मांसपेशींमध्ये वेदना होऊ लागतात. अशात अनेकजण या वेदनांपासून सुटका करुन घेण्यासाठी पेनकिलरचा आधार घेतात. जर तुम्हाला या दुखण्याचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही पेनकिलर घेण्याऐवजी काही घरगुती उपायांनी हे दुखणं थांबवू शकता. (Image Credit : htv.com.pk)

शरीराच्या अंतर्गत अंगांमधील सूज हे दुखण्याचं मुख्य कारण असतं. आर्थरायटिस, कंबर आणि मानेमध्ये दुखणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागल्यावर काही घरातील पदार्थांच्या मदतीने तुम्ही हे दुखणं पळवून लावू शकता. हे पदार्थ प्रत्येक स्वयंपाक घरात सहर उपलब्ध होणारे असतात. (Image Credit : Philly.com)

दालचीनी - दालचीनीमध्ये आढळणारे यूजेनाल आणि सिनेमेल्डीहाइड वेदना दूर करण्याचं काम करतात. दालचीनी रक्ताचा प्रवाह योग्य ठेवते. तसेच याने जळजळही दूर होते.

जिरे - जिऱ्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतं. याने पचनक्रिया चांगली राहण्यासोबतच सूज दूर होण्यासही मदत होते. रक्त शुद्ध करण्यासाठीही जिरे महत्त्वाची भूमिका बजावतात.

हळद - अर्थरायटिसचं दुखणं कमी करण्यासाठी हळद एक चांगला पर्याय आहे. हळदीमध्ये आढळणारं कूरकूमिन तत्त्वात वेदना दूर करण्याची क्षमता असते.

आलं - आल्यामध्ये गिंजरोल आढळतं. तसेच आल्यामध्ये सर्दी दूर करण्याचेही उपायही असतात. तसेच याने अर्थरायटिसची वेदना दूर करण्यासही मदत होते.

लवंग - अनेकदा पदार्थ सुगंधित करण्यासाठी लवंगेचा वापर केला जातो. तसेच दातांचं दुखणं दूर करण्यासाठीही लवंग वापरली जाते. दातांच्या समस्येसाठी लवंगीचं तेल सर्वात चांगलं औषध मानलं जातं. त्यासोबतच यात आढळणारं यूजेनाल जळजळ आणि वेदना दूर करण्यासाठीही फायदेशीर असतं.