मॉर्निंग वॉक शरीरासाठी आरोग्यदायी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 06:20 PM2018-12-12T18:20:32+5:302018-12-12T18:27:21+5:30

अनेक लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याचा कंटाळा येतो. परंतु रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याचे अनेक फायदे आहेत.

सकाळी उठून मॉर्निंग वॉकला गेल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

दररोज सकाळी मॉर्निंग वॉक केल्यामुळे मन प्रसन्न आणि उत्साही राहण्यास मदत होते.

सकाळची हवा दिवसभराच्या वातावरणापेक्षा शुद्ध समजली जाते. त्यामुळे सकाळच्या मॉर्निंग वॉकमुळे शरीराला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते.

सकाळची सुर्यकिरणं कोवळी असतात. शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी सकाळचं कोवळं ऊन फायदेशीर ठरतं. त्यामुळे हाडं बळकट होण्यास मदत होते.

मॉर्निंग वॉकमुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.