बापरे! H3N2, H1N1 आणि कोरोना, 3 आजारांचा एकत्रित प्रकोप; जाणून घ्या, फरक, लक्षणं, उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 01:48 PM2023-03-17T13:48:08+5:302023-03-17T13:56:13+5:30

H3N2, Covid-19, स्वाइन फ्लू आणि H1N1 मुळे भारतात व्हायरल इन्फेक्शन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.

H3N2, Covid-19, स्वाइन फ्लू आणि H1N1 मुळे भारतात व्हायरल इन्फेक्शन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. या काळात H3N2 ची अनेक प्रकरणे समोर येत असली तरी, भारतात स्वाईन फ्लू आणि कोरोनाचे रुग्णही झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाची 4,623 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर आकडेवारीमध्ये असेही सांगण्यात आले आहे की 28 फेब्रुवारीपर्यंत गेल्या महिन्यात H1N1 चे एकूण 955 प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, एकीकडे काही लोकांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्यांची सौम्य प्रकरणे नोंदवली जात आहेत, तर दुसरीकडे काही लोकांमध्ये, विशेषत: वृद्ध लोकांमध्ये अत्यंत गंभीर लक्षणे दिसून येत आहेत.

केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, H3N2 प्रकारामुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये अलीकडे H3N2 ची प्रकरणे देखील नोंदली गेली आहेत. H3N2, कोरोना, स्वाईन फ्लू आणि H1N1 हे सर्व व्हायरल इन्फेक्शन आहेत.

H1N1, पूर्वी स्वाइन फ्लू म्हणून ओळखला जात होता, हा इन्फ्लूएंझा व्हायरसप्रमाणेच प्राण्यांमध्ये होणारा आजार आहे. त्याच वेळी, हवामानातील बदलामुळे, लोकांना फ्लू आणि सामान्य सर्दीचा सामना करावा लागतो, जे अनेकदा हानिकारक सिद्ध होत नाही.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार साधारण 200 ते 300 प्रकारच्या व्हायरसमुळे सर्दीचा सामना करावा लागतो. प्रत्येक व्हायरसचा स्वतःचा सब टाईप आणि व्हेरिएंट असतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, सामान्य सर्दीची समस्या rhinovirus, रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस, इन्फ्लूएंझा प्रकार A आणि प्रकार B व्हायरसमुळे होते.

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, H3N2 च्या वाढत्या केसेसमुळे लोक आधीच खूप चिंतेत होते. याच दरम्यान, पुन्हा एकदा कोविड 19 च्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांची चिंता अधिकच वाढली आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, एकीकडे काही लोकांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्यांची सौम्य प्रकरणे नोंदवली जात आहेत, तर दुसरीकडे काही लोकांमध्ये, विशेषत: वृद्ध लोकांमध्ये अत्यंत गंभीर लक्षणे दिसून येत आहेत.

रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा ज्यांना आधीच त्रास आहे काही गंभीर आजार अशा लोकांना त्रास होऊ शकतो. या सर्व संसर्गामध्ये ताप, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी, कफ आणि घसा खवखवणे यासारखी काही लक्षणे दिसून येतात असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या सर्व व्हायरसची लक्षणे एकमेकांशी सारखीच असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला सामान्य सर्दी किंवा H3N2, Covid-19, स्वाइन फ्लू आणि H1N1 आहे की नाही हे शोधणे खूप कठीण होते.

H3N2 मुळे आवाजात जडपणा जाणवतो. तर, कोविड-19 ची सुरुवात ताप आणि वास येण्याने होते. फ्लूमुळे संपूर्ण शरीर आणि स्नायूंना खूप वेदना सहन कराव्या लागतात. फ्लूमुळे कोरड्या खोकल्याच्या समस्येला दीर्घकाळ सामोरे जावे लागते.

आरोग्य तज्ञांनी असेही सांगितले की कोविड-19 ची काही लक्षणे, जी इन्फ्लूएंझा ए व्हायरसने ग्रस्त लोकांमध्ये फारच क्वचित दिसतात, त्यात वास आणि अन्नाची चव कमी होणे आणि संपूर्ण शरीरावर पुरळ उठणे यांचा समावेश होतो.

ताप आणि खोकला इत्यादी फ्लूच्या काही लक्षणांसाठी तुम्ही पेनकिलर, नेब्युलायझर घेऊ शकता असे आरोग्य तज्ञ सुचवतात. यासोबतच तुम्ही घरीच राहून आराम करणे आणि साधे घरगुती अन्न खाणे, तसेच स्वत:ला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे.

फ्लू टाळण्यासाठी, तुम्ही कोविडच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. फ्लूशी संबंधित समस्या टाळण्यासाठी, आपण इन्फ्लूएंझा लसीकरण घेणे महत्वाचे आहे. जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.