उन्हाळ्यात अनेकदा कैरीचं पन्ह प्यायले असालच, आता त्याचे फायदे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:23 PM2024-03-13T12:23:19+5:302024-03-13T13:08:11+5:30

Aam Panna Benefits In Summer: कैरीचं पन्ह कसं तयार केलं जातं हे जवळपास सगळ्यांनाच माहीत असेल. हे पिण्यासाठी जेवढं चांगलं लागतं तेवढे त्याचे आरोग्याला फायदे होतात.

Aam Panna Benefits In Summer: उन्हाळा आला की, गरमी आणि उष्णतेमुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात हे सगळ्यांना माहीत असतं. पण या समस्या दूर करण्याचे सोपे सोपे उपाय त्यांना माहीत नसतात. उन्हाळ्यात आमरस तर सगळेच खात असतील. सोबतच कच्ची कैरीही खात असतील. पण अनेकांना हे या दिवसात कैरीच्या पन्ह्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कैरीचं पन्ह कसं तयार केलं जातं हे जवळपास सगळ्यांनाच माहीत असेल. हे पिण्यासाठी जेवढं चांगलं लागतं तेवढे त्याचे आरोग्याला फायदे होतात. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर, आयर्न, कॅल्शिअम आणि पोटॅशिअमसारखे तत्व असतात. उन्हाळ्यात याचं सेवन केल्याने शरीराला गारवा मिळतो आणि हिट स्ट्रोकपासून बचावही होतो. चला जाणून घेऊ याचे फायदे...

इम्यूनिटी मजबूत होते - उन्हाळ्यात बॅक्टेरिअर आणि वायरल इन्फेक्शन होण्याचा धोका खूप वाढतो. कैरीच्या पन्ह्यातील व्हिटॅमिन सी आणि अॅटी-ऑक्सिडेंटमुळे तुमची इम्यूनिटी बूस्ट होते. हे प्यायल्याने शरीराला अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत मिळते.

हिट स्ट्रोक आणि डिहायड्रेशन - उन्हाळ्यात घाम अधिक जात असल्याने नेहमीच डिहायड्रेशनची समस्या होते. अशात कैरीचं पन्ह शरीरात इलेक्ट्रोलाइट बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतं. हे प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहतं आणि शरीरातील पाणी कमी होत नाही. कैरीचं पन्ह थंड असतं, त्यामुळे याने हिट स्ट्रोकपासूनही बचाव होतो.

पचनासंबंधी समस्या होते दूर - कैरीच्या पन्ह्याचं सेवन करणं पोटासाठी फार फायदेशीर असतं. याच्या सेवनाने पोटातील उष्णता दूर होते. याने उन्हाळ्यात पोट थंड राहतं. यात फायबर असतं जे पचनास मदत करतं. तसेच पचन तंत्र चांगलं राहतं. त्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात.

रक्त कमी होत नाही - एनीमियाची समस्या झाल्यावर कैरीच्या पन्ह्याचं सेवन फायदेशीर मानलं जातं. कारण यात आयर्न असतं जे शरीरात हीमोग्लोबिनची लेव्हल वाढवतं. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळते. सोबतच शरीरात ऊर्जाही कायम राहते.

तोंडाचं आरोग्य - कैरीच्या पन्ह्याचं सेवन करून तोंडाचं आरोग्यही चांगलं राहतं. याच्या सेवनाने तोंडाची दुर्गंधी, किड आणि हिरड्यातून रक्त येणं या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

डोळे राहतात निरोगी - कैरीच्या पन्ह्यात व्हिटॅमिन ए असतं, जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. नियमितपणे याचं सेवन केल्याने तुमचा डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो.

ही काळजी घ्या - उन्हाळ्यात कैरीचं पन्ह सेवन करून शरीराला अनेक फायदे मिळतात. पण ही काळजी घ्या की, याचं सेवन जास्त प्रमाणात करू नये. याच्या जास्त सेवनाने तुम्हाला डायबिटीस, लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर आणि डायरिया यांसारख्या समस्याही होऊ शकतात.