डेंग्यूच्या रुग्णांनी करावं या 5 गोष्टींचं सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 06:59 PM2018-02-23T18:59:52+5:302018-02-23T18:59:52+5:30

डेंग्यू झालेल्या रूग्णांना आरोग्याच्या दृष्टीनं त्यांच्या आहारात शाकाहारी पदार्थांचा समावेश करावा लागतो. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या खोबणीत, त्याभोवती तीव्र दुखणे, खूप थकवा अशी डेंग्यूची लक्षणे डेंग्यूमध्ये काही रुग्णांमध्ये दिसतात. यामुळे थकवादेखील मोठ्या प्रमाणात जाणवतो. अशा परिस्थितीत शरीराला आराम मिळावा, यासाठी आहारात काही पदार्थांचा जाणीवपूर्वक समावेश करावा जेणेकरुन शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास मदत मिळेल.

1. फळांचा रस - डेंग्यूसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ताज्या फळांचा रस घेणं आवश्यक असते. गाजर, काकडी तसंच हिरव्या भाजांमध्ये जीवनसत्त्व व क्षारांचे प्रमाण प्रचंड असल्यानं शरीरातील ऊर्जा भरुन निघण्यास मदत मिळते. त्यामुळ डेंग्यूच्या रूग्णांनी आपल्या आहारात फळांच्या रसांचा समावेश करावा.

2. सत्रे - संत्र्यांमध्ये शरीरासाठी उपयुक्त असलेली पोषक जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. संत्र्यांमध्ये असलेले सी जीवनसत्त्व हे अॅन्टीऑक्सिडन्टचे कार्य करते आणि शरीरात फायबर्सची क्षमता वाढण्यास मदत मिळते. डेंग्यूच्या रूग्णांना जर अपचनाचा त्रास होत असेल तर त्यांच्यासाठीही संत्र्यांचे सेवन फायदेशीर ठरते.

3. कडूलिंबाची पाने - आयुर्वेदामध्ये कडूलिंबाच्या पानांना डेंग्यूसाठी गुणकारी मानले जाते. कडूलिंबाची पाने डेग्यूंच्या रुग्णांच्या शरीरात होणाऱ्या संसर्गासाठी प्रतिबंध करतात व कडूलिंबाच्या पानांमुळे डेंग्यूचा रुग्ण लवकर बरादेखील होतो.

4. गवती चहा किंवा आल्याचा चहा - डेंग्यूमध्ये रूग्णांना येणारा ताप आल्याचा चहा प्यायल्याने कमी होतो, असे म्हटले जाते. तसंच शरीरात अॅन्टीऑक्सिडन्टचं प्रमाण वाढतं. गवती चहामध्ये मोठ्या प्रमाणावर गुणकारी असे घटक असल्याने डेंग्यूच्या रूग्णांना लवकर बरे करण्यात याची मदत होते.

5. नारळाचे पाणी - नारळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार व पोषक घटक असतात. डेंग्यूच्या रूग्णांसाठी नारळाचं पाणी पोषक असे असते. रोजच्या आहारातही नाराळाच्या पाण्याचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळण्यात मदत होते.