लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरदेवाने मामाकडे सोपवली नवी नवरी, तीन महिन्यांनी पोलिसात तक्रार...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:45 PM2022-06-14T12:45:56+5:302022-06-14T12:56:41+5:30

UP Crime News : गोरखपूरच्या गुलहिरा भागात राहणाऱ्या तरूणीचं लग्न गोंडा जिल्ह्यातील एका तरूणासोबत ठरलं होतं. तरूणीच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिचं लग्न जुळवलं होतं.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने कथितपणे लग्न करून आपल्या नव्या नवरीला मामाच्या हवाली केलं. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणाचा मामा गोंडामध्ये राहतो. जिथे ती तीन महिने त्याच्यासोबत राहिली. यादरम्यान ती हट्ट करून त्याच्यासोबत माहेरी गेली आणि आपल्या परिवाराला सगळं काही सांगितलं. हे समजल्यावर तरूणीच्या परिवाराने मामाला दोरीने बांधून मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

गोरखपूरच्या गुलहिरा भागात राहणाऱ्या तरूणीचं लग्न गोंडा जिल्ह्यातील एका तरूणासोबत ठरलं होतं. तरूणीच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिचं लग्न जुळवलं होतं. पण आरोप आहे की, जेव्हा वरात पोहोचली तेव्हा तिथे दुसराच व्यक्ती नवरदेव बनून बसला होता. यावर मुलीकडच्यांनी आक्षेप घेतला. मुलाकडच्या लोकांना तो आजारी असल्याचं कारण देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की, तरूणाला मिरगी येते, त्यामुळे या दुसऱ्या मुलासोबत तिचं लग्न लावून द्या.

तरूणीच्या कुटुंबियांनुसार, समाजात बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी लग्नाला होकार दिला आणि तरूणीचं लग्न त्या दुसऱ्या तरूणासोबत लावून दिलं. त्यानंतर तरूणीची पाठवणी केली आणि ती सासरी गोंडा येथे गेली. जिथून तीन महिन्यांनी परतल्यावर तिने सगळा प्रकार सांगितला.

तरूणीचा आरोप आहे की, लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या पतीचा मामा रूममध्ये आला होता. हे बघून ती हैराण झाली आणि तिने याचा विरोध केला. पण सासरच्या लोकांनी तिला मामासोबत जबरदस्ती रूममध्ये बंद केलं. तेव्हा तिला मारहाण करण्यात आली.

तरूणीनुसार, तिने कसेतरी त्रास सहन करत तीन महिने काढले. त्यानंतर तिने माहेरी जाण्याचा हट्ट केला तेव्हा तोच मामा तिला माहेरी सोडण्यासाठी आला. आपल्या घरी जाऊन तरूणीने कुटुंबियांना सगळा प्रकार सांगितला. ज्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं.

कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुलहिरा पोलिसांनी लग्न जुळवणाऱ्या महिलेसोबत मामालाही ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी सांगितलं की, आरोपांची चौकशी केली जात आहे. घटनास्थळ गोंडा आहे त्यामुळे गलहिरामध्ये एफआयआर दाखल करता आलेली नाही.