साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, कुटुंबाचे सहकार्य; प्राप्तीत वाढ, हरि-हर शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 07:07 AM2024-03-18T07:07:07+5:302024-03-18T07:07:07+5:30

Weekly Horoscope: आगामी कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी गुरू आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, प्लूटो मकरेत, मंगळ, शुक्र आणि शनी कुंभेत, तर रवी, बुध, राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून राहील.

बुधवारी आमलकी एकादशी, तर शुक्रवारी प्रदोष आहे. यानंतर होळीचा सण येणार आहे. ही आमलकी एकादशी या मराठी वर्षाच्या शुद्ध पक्षातील शेवटची एकादशी आहे. यानंतर कृष्ण पक्षातील एकादशीनंतर हे मराठी वर्ष संपणार आहे. एप्रिलमध्ये नवे मराठी वर्ष सुरू होणार आहे.

या आगामी काळातील ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? कोणत्या राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? कोणत्या राशींना लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...

मेष: कामकाजात अत्यंत व्यस्त राहाल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. परंतु आपण सध्याची नोकरी न सोडणे हे आपल्या हिताचे होईल. भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना लाभ होईल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जीवन सुखावह होईल. जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरवाल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून पूर्ण लाभ मिळेल. प्राप्ती उत्तम राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. खर्चांवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. नव्याने आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

वृषभ: ऋतू बदल होत असल्याने प्रकृतीस जपावे. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा उत्तम आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा ऐकावयास मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. खर्च खूप होतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ प्रतिकूल आहे. घरात एखादा सोहळा असल्यामुळे विद्यार्थी मन लावून अभ्यास करू शकणार नाहीत. असे असले तरी ते त्यांच्या मित्रांच्या मदतीने चांगली कामगिरी करू शकतील. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल. नवीन कंत्राट मिळेल. वडिलांजवळ मन मोकळे कराल.

मिथुन: वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगत असल्याचे दिसून येईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. घरात पूजा-पाठ इत्यादींचे आयोजन होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगती करण्याची संधी मिळेल. व्यापाराची वृद्धी करण्यात यशस्वी होऊ शकाल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसले तरी एखादी व्यक्ती त्यांच्या अध्ययनात विघ्न आणू शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील. खर्च वाढतील. घर दुरुस्तीसाठी सुद्धा भरपूर पैसा खर्च कराल. मुलांच्या अभ्यासावर जास्त खर्च होईल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल.

कर्क: आगामी कालावधी आर्थिक दृष्ट्या अनुकूल आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. प्रेमीजन प्रेमिकेच्या सहवासात खुश असल्याचे दिसून येईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. घरासाठी खूप खर्च होऊ शकतो. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक कराल.

सिंह: कुटुंबियांच्या सहवासात थोडा वेळ घालवून धन संचय कसा करावा हे शिकून घ्याल. आगामी काळात काही त्रास होणार नाही. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसतील. एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्यास मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी बोलताना वाणीत गोडवा ठेवावा लागेल. व्यावसायिक व्यवसायास पुढे नेण्यात यशस्वी होतील. कोणाच्या सांगण्यावरून कोणतीही आर्थिक गुंतवणूक करू नये, अन्यथा आपणास नुकसान सोसावे लागू शकते.

कन्या: कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखाल. एखाद्या नातेवाईकाच्या मदतीने प्राप्तीचे साधन मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या पार्टीत सहभागी व्हाल. ज्या व्यक्ती समाज कल्याणासाठी कार्यरत आहेत त्यांच्या मान-सन्मानात वृद्धी होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. मनातील विचार आई-वडिलांसमोर व्यक्त कराल.

तूळ: विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. परीक्षेत यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक व्यवसायास पुढे नेण्यात यशस्वी होतील. नवीन संधी मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. शेअर्स बाजारात गुंतवणूक करावयाची असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विवाहेच्छुकांच्या विवाह प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. वैवाहिक जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. मुलांच्या शिक्षणावर जास्त पैसा खर्च होईल. कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखाल, त्यात जास्त पैसा खर्च होईल.

वृश्चिक: कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर येईल, ज्यात पगार जास्त असेल. कार्यभार जास्त असल्याने प्रकृती खालावत असल्याचे दिसून येईल. घरी पाहुण्यांची वर्दळ राहील. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. आजूबाजूस किंवा शेजारी होत असलेल्या समारंभात कुटुंबियांसह सहभागी व्हाल. राजकारणात यश प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. घराच्या दुरुस्तीसाठी जास्त पैसा खर्च कराल.

धनु: वैवाहिक जोडीदारासह एखाद्या नवीन कार्याची सुरवात कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. ऋतू बदलामुळे प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचे दिसू शकते. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी खूप मेहनत करतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल.

मकर: स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना यश प्राप्त होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी अध्ययनावर लक्ष देऊन यश प्राप्त करतील. एखादा व्यवसाय भागीदारीत करण्याचे आयोजन कराल व त्यासाठी कुटुंबियांशी बोलणी कराल. विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्राप्तीत वाढ होईल.

कुंभ: जोडीदाराच्या सकारात्मक बाजूचा परिचय होईल. व्यावसायिक व्यवसायात काही बदल करतील. ज्यात जास्त पैसा खर्च होईल. नोकरी करणाऱ्यांना कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी कालावधी उत्तम आहे. विद्यार्थी मन लावून अध्ययन करत असल्याचे दिसून येईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे नुकसानदायी होऊ शकते. कौटुंबिक जीवनावर काही खर्च होऊ शकतो. जे समाज कल्याणासाठी कार्य करत आहेत त्यांना मान-सन्मान प्राप्त होईल.

मीन: विवाहितांच्या आयुष्यात आनंद येऊ शकेल. वैवाहिक जोडीदाराच्या नावाने एखादे नवीन कार्य सुरु करू शकता. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. व्यापारी आयात-निर्यातीशी संबंधित काम करतात त्यांना चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. राजकारणात कारकिर्द घडवायची असेल काळ अनुकूल आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसतील. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. नोकरीत बदल करण्यासाठी काळ अनुकूल आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जास्तीचा खर्च होणार नाही. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. आई-वडिलांना मनातील विचार सांगाल.