घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ही झाडं लावणं मानलं जातं शुभ, वाढते पॉझिटिव्ह एनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 08:57 PM2022-06-25T20:57:41+5:302022-06-25T21:01:18+5:30

वास्तूचा झाडं आणि रोपांशी विशेष संबंध असतो आणि ते सकारात्मक उर्जेचा स्रोत मानले जातात.

तुळशीचे रोप धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते, तर वास्तूमध्ये तुळशीला सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते. तुळशीचे रोप यासाठीदेखील महत्वाचे आहे कारण ते दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी ऑक्सिजन सोडते. जेव्हा हे रोप मुख्य प्रवेशद्वारावर लावले जाते तेव्हा ते सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि आपल्या घरासाठी लकी मानले जाते. तुळीशीचं रोप धनदेखील आकर्षित करते असे म्हटले जाते.

जास्मिन वनस्पती खूप भाग्यवान आणि सकारात्मक उर्जा असलेली मानली जाते. याचा सुवास मनालाही शांती देत असतो. असे म्हटले जाते की जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर जास्मिनचे रोप लावले तर ते तुमचे घर सुगंधाने भरेलच पण संपत्तीतही वाढ होईल.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाम ट्री लावण्याचाही एक पर्याय दिसतो. पाम ट्रीला एक एअर प्युरिफाईंग प्लांट म्हटलं जातं. याची देखरेख करणंही सोप असतं. मुख्य दरवाज्याजवळ पाम ट्री लावल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी वाढते असे म्हटले जाते. यामुळे तुमच्या घरात पॉझिटिव्ह वाईब्स वाढतात.

मुख्य दरवाज्यावर मनी प्लांट लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. मनी प्लांट घराच्या बाहेर लावा किंवा आत ती घरातील आनंद वाढवते असं म्हटलं जातं. मनी प्लांटची वेल मुख्य दरवाज्यावर लावल्यानं तुमच्या घरात सुख समृद्धी येते असेही म्हटले जाते.

फर्न प्लांट दिसायला जितके आकर्षक असते तितकेच ते लकीही असते. बोस्टर्न फर्न प्लांट तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावल्याने तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते असे म्हटले जाते. जर हे तुमच्या घराच्या समोर ठेवले तर गुडलक चार्मही वाढवते असे म्हणतात.

फेंग शुईनुसार सिट्रस ट्रीदेखील अतिशय लकी असल्याचे म्हटले जाते. यामुळे घरात समृद्धी येते असे म्हणतात. परंतु हे झाड घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर ठेवण्याऐवजी उजवीकडे ठेवावे. हे झाड अतिशय शुभ मानले जाते.