बुधाचे मीन गोचर: ७ राशींना लाभच लाभ, समस्यांतून दिलासा; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 12:05 PM2024-03-08T12:05:22+5:302024-03-08T12:12:56+5:30

बुधाचा मीन राशीतील प्रवेशाचा सर्व राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत विराजमान झाला आहे. मार्च महिन्यात बुध दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. मीन राशीत विराजमान झालेला बुध महिन्याच्या अखेरीस मेष राशीत प्रवेश करणार आहे.

मीन राशीत प्रवेश केल्यावर बुध आणि राहुचा युती योग जुळून येणार आहे. हा योग अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. बुध हा वाणी, बुद्धिमत्ता, संपत्ती आणि भावनांचा कारक मानला जातो. कुंडलीत बुध ग्रह बलवान असेल, तर बुद्धी खूप कुशाग्र असते आणि ते उच्च शिक्षण घेतात, असे मानले जाते. तर राहु हा क्रूर आणि छाया ग्रह मानला जातो.

बुधचा मीन राशीत झालेला प्रवेश अनेक राशींसाठी आव्हानात्मक, समस्याकारक तसेच अडचणींचा ठरू शकतो. तर काही राशींसाठी शिक्षण, आर्थिक आघाडी, व्यवसाय, कुटुंब, वैवाहिक जीवनात सकारात्मकता येऊ शकते. तुमच्या राशीवर कसा असेल बुध मीन गोचराचा परिणाम, ते जाणून घेऊया...

मेष: परदेश प्रवासाचा लाभ मिळेल. कोणालाही जास्त पैसे देऊ नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. खर्च वाढू शकतो. अनेक नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. वाद टाळा, रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. दररोज योगासने आणि ध्यानधारणा करावी.

वृषभ: बुधाचा प्रभाव सर्व प्रकारे लाभदायक राहील. कामाचे कौतुक होईल. निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधितांची प्रगती होईल. नवीन सौदे होऊ शकतील. आर्थिक स्थिती सुधारेल. अनेक नवीन संधी मिळतील. शक्यतो मोठी गुंतवणूक करणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवून बोला.

मिथुन: व्यवसायात प्रगती होईल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागातील प्रलंबीत कामे पूर्ण होतील. घर किंवा वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. योजना गोपनीय ठेवून काम केल्यास अधिक यशस्वी व्हाल. काम पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. सकारात्मक राहून आव्हानांचा सामना करा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मनोबल वाढेल.

कर्क: नशीब आणि भाग्याची भक्कम साथ मिळू शकेल. सरकारी विभागाचे सहकार्य मिळू शकेल. परदेशात उच्च शिक्षण घेत होते त्यांना विशेष यश मिळू शकते. कामानिमित्त काही दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे. कौशल्याच्या जोरावर रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात लाभ होईल. घाईगडबडीत कोणताही व्यवहार करू नका. अध्यात्मिक कार्याकडे ओढा वाढेल. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील.

सिंह: कामाच्या ठिकाणी सावध राहावे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील. अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. खर्च वाढू शकतो. मेहनतीने आगामी काळात आर्थिक परिस्थितीत स्थिरता आणू शकाल. कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

कन्या: नवीन संधी आणि बदल दोन्ही दिसतील. व्यवसायात भागीदारांशी पारदर्शकता ठेवावी लागेल. व्यवसायाशी संबंधित अनेक समस्या असू शकतात. पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या दबावामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो. खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. सरकारी खात्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या निविदा इत्यादीसाठी अर्ज करावयाचा असल्यास काळ अनुकूल आहे.

तूळ: गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. आरोग्याची काळजी घ्या. परदेश प्रवासाचा लाभ मिळेल. परदेशी कंपन्यांमध्ये सेवेसाठी किंवा नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक प्रयत्न करावे लागतील. कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी रणनीती बनवून पुढे जावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवहाराबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या.

वृश्चिक: बुधाचे गोचर आर्थिक बाबतीत चांगले सिद्ध होईल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. आव्हानांना धैर्याने सामोरे गेल्यास अनेक समस्या सुटतील. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संबंध अधिक घट्ट होतील. घेतलेले परिणाम दूरगामी आणि फायदेशीर ठरतील.

धनु: अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. यश मिळूनही कौटुंबिक कलह आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागेल. घर किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर त्या दृष्टीने ग्रहांची स्थिती अनुकूल राहील. घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल. अधिक जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना खूप फायदा होईल. नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन या क्षेत्राशी निगडित लोकांना फायदा होईल. गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ आहे. भविष्यात मोठा लाभ होऊ शकेल. कुटुंबासोबत काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता.

मकर: स्वभावात सौम्यता येईल. शहाणपणाने कठीण प्रसंग सहज हाताळू शकाल. अध्यात्माची आवड वाढेल. नवीन लोकांशी संवाद वाढेल. शुभ कार्याच्या संधी येतील. जास्त व्यस्ततेमुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होईल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी विचारपूर्वक पुढे जावे लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

कुंभ: अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी सावधगिरीने पुढे जावे लागेल. गैरसमज दूर करण्यासाठी निवांतपणे बोला, यामुळे मुद्दे नीट समजावून सांगता येतील. पैशाशी संबंधित बाबींमध्ये खूप सावध राहण्याची गरज आहे. उसने दिलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे. बोलण्याच्या कौशल्याच्या मदतीने कठीण प्रसंगांवरही सहज नियंत्रण ठेवू शकाल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकतील.

मीन: सावध राहा. शेअर्स आणि सट्टेबाजारात गुंतवणूक करण्याची ही वेळ नाही. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. ध्यानधारणा आणि योगासने करावी. केंद्र किंवा राज्य सरकारच्या खात्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सरकारी निविदांसाठी अर्ज करायचा असेल, तर अनुकूल काळ असेल. परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.