सन्सस्क्रिनचा जास्त वापर नको, होऊ शकतं 'हे' नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 12:15 PM2018-04-26T12:15:45+5:302018-04-26T12:15:45+5:30

उन्हाळ्यात बाहेर फिरण्यासाठी जाताना सन्सस्क्रिन वापरण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. तो योग्यही आहे. पण सन्सस्क्रिनमध्ये असलेल्या घातक केमिकल्समुळे त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. म्हणून उन्हाळ्यात सनस्क्रिनचा जास्त वापर करू नका.

१) अॅलर्जीची शक्यता - उन्हाळ्यात जास्त प्रमाणात सनस्क्रिन लावल्याने त्वचेचा पोत बिघडतो. म्हणून सनस्क्रिन विकत घेताना शक्यतो आयुर्वेदिक सनस्क्रिन घ्या.

२) मुरूमांचं प्रमाण वाढणं - सनस्क्रिनमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूमांचं प्रमाण वाढतं. तसंच त्वचा जास्त प्रमाणात तेलकट होते.

३) डोळ्यांना इजा - सनस्क्रिन लावताना डोळ्यात गेल्यास डोळ्यातून पाणी येऊन त्रास होतो. म्हणून सनस्क्रिन लावताना शक्यतो डोळ्यात जाऊ देऊ नका.

४) लहान मुलांना सनस्क्रिनसाठी मनाई - तुमच्या मुलांना उन्हात बाहेर खेळण्यासाठी जाताना सनस्क्रिन लावू नका. त्यामुळे त्यांच्या त्वचेला हानी होऊ शकते.

५) अंघोळ केल्यावर लगेच सनस्क्रिन लावू नका - अंघोळ केल्यावर त्वचेवरील छिद्रे उघडतात, म्हणून लगेच सनस्क्रिन लावल्यास चेहऱ्याचं नुकसान होतं.