शाओमीची EV क्षेत्रात दमदार एन्ट्री; लॉन्च केली पहिली इलेक्ट्रीक SUV, रेंज तब्बल 800km...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 02:48 PM2024-02-27T14:48:54+5:302024-02-27T14:58:07+5:30

Xiaomi SU7 Unveiled in MWC24: आघाडीची स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi ने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV लॉन्च केली आहे. पाहा फीचर्स...

Xiaomi SU7 Unveiled in MWC24: चीनमधील आघाडीची स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi ने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये अधिकृतपणे आपली पहिली इलेक्ट्रिक SUV 'SU7' लॉन्च केली आहे.

दरम्यान, कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा आपली इलेक्ट्रिक SUV जगासमोर आणली होती. पण, ही बाजारात कधी उपलब्ध होणार, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

लुक आणि डिझाईनमध्ये ही कार बऱ्याच प्रमाणात 'पोर्शे'चा फील देते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही कार सिंगल चार्जवर तब्बल 800 किमीची रेंज देण्याचा दावा कंपनी करत आहे. स्पेनच्या बार्सिलोना येथे मोबाइल वर्ल्ड काँग्रेस सुरू आहे, ज्यात Xiaomi ने आपल्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे.

Xiaomi SU7 ही 4-डोअर इलेक्ट्रिक सिडान कार आहे, जी 4997 मिमी लांब, 1963 मिमी रुंद आणि 1455 मिमी उंच आहे. या कारचा व्हीलबेस 3000 मिमी आहे.

कंपनीने ही कार 2 बॅटरी व्हेरियंटसह लॉन्च केली आहे. तसेच, कार तीन रंगामध्ये उपलब्ध असेल. S7U चे पूर्ण रुप Speed ​​Ultra आहे, म्हणजेच ही कार अल्टिमेट स्पीडचा अनुभव देईल.

कारच्या बेस व्हेरिएंटमध्ये 73.6 kWh चा बॅटरी पॅक मिळेल, तर टॉप व्हेरिएंटमध्ये 101 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीने आपले सीटीबी (सेल टू बॉडी) तंत्रज्ञान वापरले आहे. कारचे बेस व्हेरिएंट 210 किमी प्रतितासचा टॉप स्पीड देईल, तर टॉप व्हेरिएंट 265 किमी प्रतितासचा टॉप स्पीड देईल.

इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, पार्किंग असिस्ट आणि मनोरंजनाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. कारमध्ये 25 स्पीकर सिस्टम असेल. तसेच, ही कार सेल्फ पार्किंगसारख्या वैशिष्ट्यांसह येऊ शकते. कारमध्ये हाय रिझोल्युशन कॅमेरा, लिडर, अल्ट्रासोनिक आणि रडारदेखील मिळण्याची शक्यता आहे.