या 5 मोटारसायकल देतात एका लिटरमागे 90 किलोमीटरचं मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:12 PM2019-02-07T15:12:20+5:302019-02-07T15:30:27+5:30

भारतात जेव्हा मोटारसायकलची चर्चा होते, तेव्हा पहिल्यांदा हीरो स्प्लेंडर या गाडीची आठवण येते. हीरो स्प्लेन्डर + i3S एका लिटरमागे 102.5 किलोमीटर मायलेज देते.

बजाजची सीटी 100 या बाइकचीही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होते. बजाज सीटी 100 लिटरमागे 99.1 किलोमीटरएवढा मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

बजाज प्लॅटिना ही बाइकही आपल्याला प्रतिलिटरमागे 90 किलोमीटरहून अधिकचा एव्हरेज देते.

टीव्हीएस स्पोर्ट्स कंपनीही बाइकही इतर मोटारसायकलच्या तुलनेत स्वस्त आहे. TVS Sportमध्ये 99.7 सीसीचं इंजिन असून, ही मोटारसायकल 7.4 पीएसची पॉवर आणि 7.8NM टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाइक 95 किलोमीटरचा मायलेज देते.

हीरो मोटोकॉर्पनं स्प्लेंडर प्रोही बाइक बाजारात आणली आहे. 97.2 सीसीचं सिंगल सिलिंडरचं इंजिन देण्यात आलं आहे. स्प्लेंडर प्रो 8.3 हॉर्स पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क निर्माण करते.

टॅग्स :वाहनAutomobile