Mahindra XUV 400: नवीन अवतारात आली महिंद्रा XUV 400, फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसमध्ये घेणार भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 06:05 PM2023-02-10T18:05:13+5:302023-02-10T18:08:17+5:30

हैदराबादमध्ये Formula-E स्पर्धेत नवीन Mahindra XUV 400 सादर केली जाणार आहे.

Mahindra XUV 400 Formula Edition: भारत फॉर्म्युला ई वर्ल्ड (Formula-E) चॅम्पियनशिपच्या नवव्या हंगामाचे यजमानपद भूषवणार आहे. हा कार्यक्रम ओपन-व्हील इलेक्ट्रिक कारसाठी मोटरस्पोर्ट इव्हेंट आहे.

यंदा हैदराबादमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फॉर्म्युला रेस साजरी करण्यासाठी, नवीन जेन-3 Formula E रेस कारसह Mahindra XUV400 चे फॉर्म्युला व्हर्जनदेखील सादर केले जाणार आहे.

Mahindra XUV400 च्या फॉर्म्युला एडिशनला विशेष लुकसह डिझाइन केले आहे, जे रेसिंग स्पिरिटने प्रेरित आहे. महिंद्रा फॉर्म्युला ई या नवीन रेस कार ला महिंद्रा अॅडव्हान्स्ड डिझाईन युरोप (MADE) स्टुडिओच्या सहकार्याने डिझाइन आणि विकसित करण्यात आले आहे.

कारच्या फॉर्म्युला व्हर्जनला बॉन्ज आणि रेड रंगासह हुड आणि बाजूंना 'महिंद्रा' ब्रँडिंग दिली आहे. ब्रँडचे फॉर्म्युला ई नाव 'महिंद्रा रेसिंग' सी-पिलरवर दिसत आहे. याचे अलॉय व्हील कॉपर अॅक्सेंटसह दिलेली आहेत.

Mahindra ने XUV 400 EV साठी 26 जानेवारीपासून बुकिंग सुरू केली आहे. या SUV ला 4 दिवसांमध्ये 10,000 पेक्षा अधिक बुकिंग मिळाल्या. महिंद्रा च्या या नवीन एसयूवीसाठी 6 महीन्यांचा वेटिंग पीरियड सुरू आहे.

XUV400 EV ला EC आणि EL सारख्या दोन ट्रिम्समध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 15.99 लाख रुपयांपासून 18.99 लाख रुपयांच्या घरात आहे.

Mahindra XUV 400 EV मध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत, ज्यात 34.5kWh आणि 39.4kWh चे पर्याय मिळतात. या 375 km आणि 456 km ची सर्टिफाइड रेंज देतात. यात फ्रंट-अॅक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटर, 150 PS ची पॉवर आणि 310 Nm चा टार्क जनरेट करते.

ही गाडी फक्त 8.3 सेकंदात 0-100 किमी प्रति तासांचा वेग पकडते. या कारला 50kW डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने 50 मिनिटांत 0 ते 80 चार्ज करता येते.