Grand Vitara: 28KM प्रति लिटर; देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या SUV ला बंपर बुकिंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:28 PM2022-12-05T15:28:19+5:302022-12-05T15:33:30+5:30

Best Mileage SUV in India: सर्वाधिक मायलेज देणाऱ्या ग्रँड व्हिटाराला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. याची किंमत 11 लाखांपेक्षा कमीत सुरू होते.

Maruti Grand Vitara Booking: मारुती सुझुकीने सप्टेंबर महिन्यात आपली पहिली मिड-साइज एसयूव्ही ग्रँड व्हिटारा (Maruti Grand Vitara) लॉन्च केली होती. कंपनीने याची बुकिंग जुलै 2022मध्येच सुरू केली, तेव्हापासून या गाडीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीने खुलासा केला आहे की, मारुती ग्रँड व्हिटारासाठी सूमारे 88 हजार बुकिंग मिळाल्या असून, 55 हजार ऑर्डर्स डिलिव्हरीसाठी पेंडिंग आहेत.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या मार्केटिंग अँड सेल्स विभागाचे सीनियर एग्झिक्यूटिव्ह ऑफिसर, शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, कंपनीचे प्रोडक्शन टार्गेट या आर्थिक वर्षात 20 लाख यूनिट्सने कमी राहिले आहे. सध्या मारुतीकडे 3.75 लाख यूनिट्सच्या ऑर्डर पेंडिंग आहेत.

मारुती ग्रँड व्हिटारा एसयूव्ही मॉडेल चार ट्रिम्स- सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फासह एकूण 11 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या माइल्ड हायब्रिड मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 10.45 लाख रुपयांपासून 16.89 लाख रुपयांदरम्यान आहे. तसेच, माइल्ड हायब्रिड ऑटोमॅटिक मॉडेलची किंमत 13.40 लाख रुपयांपासून 16.89 लाख रुपयांच्या घरात आहे. याशिवाय, स्ट्रॉन्ग हायब्रिड व्हेरिएंट- झेटा+ आणि अल्फा+ ची किंमत 17.99 लाख रुपये आणि 19.49 लाख रुपये आहे.

ग्रँड व्हिटारा देशातील सर्वाधिक मायलेज देणारी एसयूव्ही आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, याचे स्ट्रॉन्ग हायब्रिड व्हेरिएंट 28Kmpl चे मायलेज देते. यात दोन इंजिन ऑप्शन- 1.5 लीटर पेट्रोल माइल्ड-हायब्रिड आणि 1.5 लीटर पेट्रोल स्ट्रॉन्ग-हायब्रिड आहे. स्ट्रॉन्ग-हाइब्रिड टेक्नोलॉजीला मारुतीने टोयोटाकडून घेतले आहे. यात सेल्फ-चार्जिंग टेक्नोलॉजी दिली आहे.

मारुती ग्रँड व्हिटारा मायलेज- माइल्ड-हायब्रिड एडब्ल्यूडी एमटी- 19.38 KMPL, माइल्ड-हायब्रिड एटी- 20.58 KMPL, माइल्ड-हायब्रिड एमटी- 21.11 KMPL, स्ट्रॉन्ग-हाइब्रिड ई-सीवीटी- 27.97 KMPL.