Driving License Address Change: आरटीओमध्ये न जाताच ड्रायव्हिंग लायसनवरचा पत्ता बदला; तेही एजंटला पैसे न देता...घरबसल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 04:31 PM2022-02-10T16:31:32+5:302022-02-10T16:46:46+5:30

How to change Driving License Address in Marathi: बऱ्याचदा १८ वर्षे पूर्ण झाली की ड्रायव्हिंग लायसन काढलेले असते, त्यावर बहुतांश वेळी गावचा पत्ता असतो. नोकरी धंद्यासाठी तुम्ही बाहेरगावी, दुसऱ्या शहरात जावे लागले असेल, तिथेच स्थायीक झाला असाल किंवा तेव्हाचे घर बदलले असेल, तर तुम्हाला या ड्रायव्हिंग लायसनवरचा पत्ता बदलावा लागणार आहे.

पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार कार्ड प्रमाणेच ड्रायव्हिंग लायसन्स हे देखील सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. ड्रायव्हिंग परवान्याशिवाय तुम्ही कोणतीही दुचाकी (बाईक, स्कूटी) किंवा चारचाकी (कार, ट्रक इ.) चालवू शकत नाही. आधार, पॅन कार्ड सारखाच या लायसनवर देखील पत्ता असतो. काही गुन्हा घडल्यास किंवा अपघात झाल्यास नातेवाईकांना कळविण्यास तो उपयोगाचा ठरतो. यामुळे हा पत्ता अपडेट असणे गरजेचे आहे.

बऱ्याचदा १८ वर्षे पूर्ण झाली की ड्रायव्हिंग लायसन काढलेले असते, त्यावर बहुतांश वेळी गावचा पत्ता असतो. नोकरी धंद्यासाठी तुम्ही बाहेरगावी, दुसऱ्या शहरात जावे लागले असेल, तिथेच स्थायीक झाला असाल किंवा तेव्हाचे घर बदलले असेल, तर तुम्हाला या ड्रायव्हिंग लायसनवरचा पत्ता बदलावा लागणार आहे.

हा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला गावच्या आरटीओमध्ये जायची गरज नाही. तो खर्च वाचणार आहे. गावी गेलात तर जाण्या येण्याचा खर्च, परत एका दिवसात काही काम होण्याची शक्यता नाही. एजंटाला हाताशी धरून त्याला पैसे द्यावे लागणार असा बरीच फोडणी असते. हे सर्व टाळून तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसनवरील पत्ता बदलू शकता. चला पाहुया कसा...

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर तुमचा पत्ता बदलण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील आणि ते कसे करता येईल याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पहा.

स्टेप 1: सर्वप्रथम parivahan.gov.in च्या अधिकृत पेजला भेट द्या. स्टेप 2: ऑनलाइन सर्विसेस अंतर्गत, तुम्हाला "Driving License Related Services" चा पर्याय निवडावा लागेल.

स्टेप 3: आता ड्रॉप-डाउन सूचीवर जा आणि तुम्हाला ज्या राज्यातून सेवा घ्यायची आहे ते निवडा. स्टेप 4: "License Related Services" पर्यायाखाली, तुम्हाला "Drivers/ Learners License" पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप 5: येथे "Apply for Change of Address" चा पर्याय निवडा. स्टेप 6: तुम्हाला अर्ज सबमिट करण्यासाठी पुढील स्क्रीन दिसेल, ती वाचा.

स्टेप 7: स्क्रीनच्या तळाशी प्रदर्शित "Continue" बटणावर क्लिक करा. स्टेप 8: या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा DL क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल.

स्टेप 9: त्यानंतर तुम्हाला "Get DL Details" वर क्लिक करावे लागेल. स्टेप 10: ड्रॉपडाउनमधील "YES" वर क्लिक करा. जिथे तुमचा ड्रायव्हिंग परवाना तपशील दिसेल.

स्टेप 11: सूचीमधून जवळचा RTO निवडा आणि नंतर "Proceed" वर क्लिक करा. स्टेप12: नवीन पत्त्यासह येथे सर्व आवश्यक तपशील भरा.

स्टेप 13: “Change of address on DL” च्या पुढील बॉक्स चेक करणे आवश्यक आहे. स्टेप 14: नंतर "Permanent", "Present", किंवा "Both" मधून कोणताही एक पर्याय निवडा आणि नंतर तपशील भरा.

स्टेप 15: नंतर Confirm > Submit वर क्लिक करा.

नवीन पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासबुक, वीज बिल), पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 आणि फॉर्म 61 ची प्रमाणित प्रत लागणार आहे.