BMW 3 Series GT Sport Review: मिड रेंज लक्झरी कार घेत असाल तर ही कार उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 11:48 AM2018-10-07T11:48:33+5:302018-10-07T11:59:24+5:30

BMW 3 Series GT (Gran Turismo) Sport या लक्झरी कारला जुलैमध्ये लाँच करण्यात आले होते. या कराची किंमत 46.6 लाख रुपये ठेवण्यात आली होती. तिसऱ्या सिरिजची ही ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली आणखी एक कार आहे. या कारमध्ये स्पोर्टी फिचर्स दिले आहेत.

BMW 3 Series GT Sport ही कार लूकच्या बाबतीत इतर कारप्रमाणे भारदस्तच आहे. यामध्ये एलईडी हेडलाईटसोबत एलईडी टेललँपही देण्यात आले आहेत. तसेच कुपे स्टाईलही देण्यात आली आहे. फ्रेमलेस विंडो सुदरता आणखीनच वाढविते.

BMW 3 Series GT Sport ही कार लूकच्या बाबतीत इतर कारप्रमाणे भारदस्तच आहे. यामध्ये एलईडी हेडलाईटसोबत एलईडी टेललँपही देण्यात आले आहेत. तसेच कुपे स्टाईलही देण्यात आली आहे. फ्रेमलेस विंडो सुदरता आणखीनच वाढविते.

कुपे स्टाईल असल्यामुळे स्लोपिंग रुफलाईन देण्य़ात आले आहे. यामुळे कार आणखी स्पोर्टी दिसते. कारच्या पुढील भागात बीएमडब्लूचे सिग्नेचर किडनी ग्रिल लुकला आणखीनच जबरदस्त बनविते.

एकंदरीत BMW 3 Series GT Sport एक स्पोर्टी लूकवाली प्रिमिअम सेदान आहे. या कारचे डिझाईन बोल्ड आणि ओव्हरऑल डिझाईन अनेकांची नजर आकर्षित करेल.

कारच्या एक्सटीरिअरपेक्षा त्याचे इंटेरिअरही जबरदस्त आहे. या कारचे इंटेरिअर लग्झरी आहे. आरामदायीपणासाठी स्पोर्ट्स सीट्स लावण्यात आले आहेत. यासोबतच ऐश ग्रेन फाइन-वुड ट्रिम दिसयला छान वाटते. स्टिअरिंग व्हील आणि गिअर नॉबवरील लाल रंगामधील शिलाई स्पोर्टी लूक प्रदान करते. कारमध्ये गिअर शिफ्ट पॅडल आणि 205 वॉटचे 9 स्पीकर्स देण्यात आले आहेत.

BMW 3 Series GT Sport मध्ये स्पेसही चांगली देण्यात आली आहे. पुढील आणि मागिल भागात चांगल्याप्रकारे लेगस्पेस देण्यात आली आहे. सोबतच हेड रुम आणि थाई सपोर्टही चांगला आहे. कारमधील सीट फुलसाईज डिझाईन केलेले असल्याने प्रवाशाला आरामदायीपणा मिळतो. तसेच रियर सीटला दुमडल्यास बूट स्पेस वाढविता येते.

लोकमतच्या टीमकडे आलेली BMW 3 Series GT Sport कार 2.0 लीटर 4 सिलिंडर इंजिनवाली होती. हे इंजिन 190hp ताकद आणि 400 न्युटन मीटरचा टॉर्क देते. दमदार इंजिनमुळे 100 किमीचा वेग 707 सेकंदामध्ये पकडते. इंजिनाला 8-स्पीड स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ऑटोमेटिक ट्रांसमिशन देण्यात आले आहे. गिअर एकदम स्मूथ आहेत.

BMW 3 Series GT Sport सर्व सेफ्टी फिचर्स देण्यात आली आहेत. 6 एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, ब्रेक असिस्ट, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल, डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल, साईड इम्पॅक्ट प्रोटेक्शन, रनफ्लॅट टायर्स, इमरजन्सी स्पेअर व्हील आणि क्रॅश सेन्सर सारखी नव्या जमान्यातील फिचर देण्यात आली आहेत.

BMW 3 Series GT Sport मध्ये नेव्हीगेशन सिस्टिम, ब्लूटूथ आणि युएसबी कनेक्टिव्हिटी, रिअर व्ह्यू कॅमेरा सारखे फिचर देण्यात आले आहेत. कारमध्ये 22.3 सेमीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 20 जीबीची मेमरी देण्यात आली आहे. साऊंड क्वालिटीही ठीकठाक आहे. अॅप्पल कारप्लेसह वायरलेस इंटिग्रेशनचीही सुविधा दिलेली आहे.

बीएमडब्ल्यूच्या कार कित्येक वर्षांपासून भारतीय रस्त्यांवर धावत आहेत. यामुळे अशा स्पोर्टी कार खरेदी करणे तोट्यातील मुळीच नाहीय. कारमध्ये स्टोरेज स्पेसची जरा कमतरता आहे. एक युएसबी असल्याने मागे बसलेल्या पॅसेंजरला अडचण जाणवते.

कमी आरपीएमवर कधी कधी ताकद मिळत नाही. मात्र, मिड रेंजच्या कारनंतर या कारचा विकल्प निराश करणारा नाही. एक साधी सेदान कारनंतर पुढील लक्झरी कारसाठी कोणी जात असेल तर ही कार एक चांगला पर्याय आहे. ही कार काहीशी स्वस्त जरी असली तरीही ती महागड्या कारशी स्पर्धा करते.