प्रो कबड्डी : यु मुंबाचा निसटता पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 10:40 PM2019-08-09T22:40:13+5:302019-08-09T22:41:15+5:30

अखेरच्या क्षणापर्यंत हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. पण अखेर बंगालने मुंबा 32-30 अशी मात करत हा सामना जिंकला.

Pro Kabaddi: U Mumba defeat from Bengal Warriors | प्रो कबड्डी : यु मुंबाचा निसटता पराभव

प्रो कबड्डी : यु मुंबाचा निसटता पराभव

Next

प्रो कबड्डी, पाटणा : आजच्या पहिल्या लढतीत यु मुंबाच्या संघाला बंगाल वॉरियर्सकडून निसटता पराभव पत्करावा लागला. मुंबा आणि बंगाल यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला. अखेरच्या क्षणापर्यंत हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. पण अखेर बंगालने मुंबा 32-30 अशी मात करत हा सामना जिंकला.

बंगाल आणि मुंबा या दोन्ही संघांनी चांगल्या पकडी केल्या. या दोन्ही संघांनी पकडींमध्ये प्रत्येकी दहा गुणांची कमाई केली. चढायांमध्ये मात्र मुंबापेक्षा बंगालचा संघ वरचढ ठरला. बंगालने चढाईमध्ये 17, तर मुंबाने 13 गुणांची कमाई केली. दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा ऑल आऊट केले. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण मिळवले. पण मुंबाने बोनसच्या रुपात तीन आणि बंगालने एक गुण मिळवला.
 

Web Title: Pro Kabaddi: U Mumba defeat from Bengal Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.