४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 11:33 AM2024-05-19T11:33:52+5:302024-05-19T11:35:32+5:30

आग्रा येथे प्राप्तिकर विभागाने चपलांचा व्यापारी आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर छापा टाकला आहे. आतापर्यंत ४० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

agra it raid officers shocked to see pile of notes worth rs 40 crore in shoe trader house | ४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. येथे तीन चप्पल व्यापाऱ्यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला, यामध्ये बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. आतापर्यंत ४० कोटी रुपयांची रोकड सापडली असून, उर्वरित रोकड मोजली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान चप्पल व्यावसायिकाच्या घरी नोटांचा ढीग सापडला, यात ५०० रुपयांच्या नोटा होत्या. रोकडची  मोजणी सुरू आहे. आयकर विभागाने नोटा मोजण्याची जबाबदारी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे.

पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई

आतापर्यंत ४० कोटींची मोजणी झाली आहे. उर्वरित रक्कम मोजली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा मोजताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.

आयकर विभागाला त्यांच्याकडे करचोरी आणि बेहिशोबी मालमत्ता असल्याचा संशय होता. विभागाला याबाबत माहिती मिळताच पथकाने तीन चपलांच्या व्यापाऱ्यांच्या आवारात छापा टाकला. मात्र, विभागीय अधिकारी अद्यापही याबाबत बोलण्याचे टाळत आहेत.

याआधी आयकर विभागाने उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती. येथील बंशीधर टोबॅको कंपनीवर विभागाने छापा टाकला होता. या कंपनीने कानपूरशिवाय मुंबई, दिल्ली आणि गुजरातमध्येही आपला व्यवसाय वाढवला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुमारे २० ठिकाणी छापे टाकण्यात आले.

Web Title: agra it raid officers shocked to see pile of notes worth rs 40 crore in shoe trader house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.