'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:56 AM2024-05-19T10:56:25+5:302024-05-19T10:59:21+5:30

Sharad  Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Lok Sabha election 2024 Sharad Pawar said that if Chhagan Bhujbal had been given the post of Chief Minister, the party would have split | 'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad  Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. '२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळत होतं पण नेतृत्वाने काँग्रेसला दिले असा आरोप अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला शरद पवार यांनी 'लोकसत्ता' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रत्युत्तर दिले. यावेळी पवार यांनी छगन भुजबळ यांच्याबाबतही मोठी गौप्यस्फोट केला.  

"२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. यानंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता पण पक्ष नेतृत्वाने ते पद काँग्रेसला दिले, असा आरोप अजित पवार यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, " २००४ मध्ये मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रि‍पदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती.त्यामुळे अधिकची मंत्रि‍पदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावरआम्ही आलो, असंही खासदार शरद पवार म्हणाले. 

राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता

"२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्षात फूट पडली असती असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला.  

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान उद्या २० मे रोजी होणार आहे. दरम्यान, काल मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा झाल्या. या सभेत दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले. 

Web Title: Lok Sabha election 2024 Sharad Pawar said that if Chhagan Bhujbal had been given the post of Chief Minister, the party would have split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.