मुंबईकर महिलांची विजयी सलामी

By admin | Published: June 28, 2016 11:52 PM2016-06-28T23:52:17+5:302016-06-28T23:52:17+5:30

अपुर्वा आचरेकर, दिव्या हेगडे आणि एश्वर्या नारायणमुर्ती या मुंबईच्या त्रयीने चमकदार विजय मिळवताना पहिल्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेच्या महिला गटात विजयी सलामी

Mumimbarkar women's winning salute | मुंबईकर महिलांची विजयी सलामी

मुंबईकर महिलांची विजयी सलामी

Next

महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन : पुरुषांमध्ये उत्कर्ष, मिशील व अखिलेश यांची चमक

मुंबई : अपुर्वा आचरेकर, दिव्या हेगडे आणि एश्वर्या नारायणमुर्ती या मुंबईच्या त्रयीने चमकदार विजय मिळवताना पहिल्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेच्या महिला गटात विजयी सलामी दिली. त्याचवेळी पुरुष गटात उत्कर्ष शिलवंत (ठाणे), मिशील शाह (मुंबई) आणि अखिलेश जोशी (पुणे) यांनी आगेकूच केली.
महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने स्पोर्ट्स युनायटेडच्या वतीने चेंबुर जिमखानाला सुरु असलेल्या या स्पर्धेत अपुर्वाने ग्रेटर मुंबईच्या अरुंधती सब्बनचे आव्हान १५-५, १५-६ असे सहजपणे संपुष्टात आणले. दिव्या हेगडेनेही दमदार बाजी मारताना ठाण्याच्या सय्यद उकाशाचा १५-८, १५-३ असा धुव्वा उडवला. तर एश्वर्याने नागपूरच्या प्रियांका पिल्लेचे आव्हान १५-३, १५-१० असे परतावले. त्याचवेळी तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पुण्याच्या युगंधरा डखोळेने झुंजार खेळ करताना ठाण्याच्या संज्योत पाताडेला १५-८, १३-१५, १५-९ असे नमवले.
त्याचवेळी, पुरुषांमध्ये मुंबईकर मिशीलने दणदणीत विजय मिळवताना नागपूरच्या सौरभ आपटेला १५-५, १५-१० असे पराभूत केले. तर, पुण्याच्या अखिलेशने एकहाती वर्चस्व राखताना मुंबईच्या राहूल सिंगचा १५-५, १५-८ असा फडशा पाडला. ठाण्याच्या उत्कर्षनेही आक्रमक खेळाच्या जोरावर अमरावतीच्या शांतनू देशमुखला १५-५, १५-४ असे लोळवले. (क्रीडा प्रतिनिधी)

 

Web Title: Mumimbarkar women's winning salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.