coronavirus: केवळ परवानगी द्या, मजुरांसोबत चालत उत्तर प्रदेशला जाईन, त्यांच्या बॅगाही उचलेन - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 02:49 PM2020-05-26T14:49:19+5:302020-05-26T14:58:09+5:30

 काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्थलांतरीत मजुरांची भेट घेतल्यानंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याला राहुल गांधी यांनी आज प्रत्युत्तर दिले

coronavirus: Just allow, I will go to UP on foot with laborers - Rahul Gandhi BKP | coronavirus: केवळ परवानगी द्या, मजुरांसोबत चालत उत्तर प्रदेशला जाईन, त्यांच्या बॅगाही उचलेन - राहुल गांधी

coronavirus: केवळ परवानगी द्या, मजुरांसोबत चालत उत्तर प्रदेशला जाईन, त्यांच्या बॅगाही उचलेन - राहुल गांधी

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब मजुरांचे प्रचंड हाल होत आहे. देशातील विविध राज्यात गेलेले हे मजूर मिळेल त्या साधनाने आपल्या मूळ गावी जात आहेत. दरम्यान, या मजुरांचे होत असलेले हाल पाहून काँग्रेसचे नेते राहुल गांधी कमालीचे व्यथित झाले आहेत. दरम्यान, स्थलांतरीत मजुरांबाबत कळवळा व्यक्त केल्याने वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या टीकेला राहुल गांधी यांनी आज प्रत्युत्तर दिले असून, सरकारने परवानगी दिल्यास मी मजुरांसोबत चालत उत्तर प्रदेशला जाईन. एकाच्या नाही १०-१५ जणांच्या बॅगाही उचलेन, असे उदगार राहुल गांधी यांनी काढले आहेत.

 काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्थलांतरीत मजुरांची भेट घेतल्यानंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी मजुरांशी चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या बॅगा उचलून त्यांच्यासोबत काही काळ चालले असते तर ते बरे झाले असते, असे त्या म्हणाल्या होत्या.

त्याला  प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, मी मजुरांच्या मनात काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. खरं सांगायचं तर यामुळे मला खूप फायदा होतो. त्यांची माहिती आणि त्यांच्याकडील ज्ञानामुळे मला फायदा होतो.  मदतीचं म्हणाल तर मी मदत करतच असतो. आता त्यांनी मला परवानगी दिल्यास मी मजुरांच्या बॅगाही उचलेन. एकाच्याच नाही तर १०-१५ जणांच्या उचलून घेऊन जाईन. निर्मला सीतारामन यांची इच्छा असेल तर मी इथून उत्तर प्रदेशला जाईन. परवानगी दिल्यास चालत जाईन. वाटेत जेवढ्या लोकांची मदत करता येईल तेवढ्यांना मदत करेन.



 दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला चढवला. यावेळी लॉकडाउन फेल झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते, की आपण 21 दिवसांत कोरोना व्हायरसवर मात करू, मात्र आता 60 दिवस झाले आहेत. आता तर देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.  लॉकडाउनही काढला जात आहे. लॉकडाउनचा हेतू पूर्णपणे फेल ठरला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या   

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त

चिंताजनक! अ‍ॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात

पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

राहुल गांधी म्हणाले, लॉकडाउनच्या चारही टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले, परिणाम मिळाले नाहीत. अशात, सरकारला विचारण्याची आमची इच्छा आहे, आता सरकार पुढे काय करणार ? कारण लॉकडाउन फेल ठरले आहे.

Web Title: coronavirus: Just allow, I will go to UP on foot with laborers - Rahul Gandhi BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.