वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 08:29 PM2021-02-20T20:29:52+5:302021-02-21T01:18:13+5:30

वणी : वणी-पिंपळगाव रस्त्यावरील मावडी शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Two-wheeler killed in vehicle collision | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next
ठळक मुद्देकुटुंबीयाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

वणी : वणी-पिंपळगाव रस्त्यावरील मावडी शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

अशोक शांताराम बदादे (रा. वाघाड, तालुका दिंडोरी) हे दुचाकीवरून वणी-पिंपळगाव रस्त्यावरून जात असताना त्याच सुमारास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली.

या अपघातात बदादे हे ठार झाले. अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून फरार झालेल्या अज्ञात वाहनचालकाविरोधात मृत्यूस कारणीभूत तसेच दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी मयताच्या कुटुंबीयाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler killed in vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.