नाशकात दुचाकी दुभाजकाला धडकल्याने दोन ठार 

By नामदेव भोर | Published: May 25, 2023 03:24 PM2023-05-25T15:24:09+5:302023-05-25T15:25:18+5:30

पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

Two killed as two-wheeler collides with divider in Nashak | नाशकात दुचाकी दुभाजकाला धडकल्याने दोन ठार 

नाशकात दुचाकी दुभाजकाला धडकल्याने दोन ठार 

googlenewsNext

नामदेव भोर /नाशिक 

नाशिक : मित्रांसोबत रात्रभर घराबाहेर असलेल्या तरुणांची दुचाकी धामणकर कॉर्नर येथील दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.  अर्णव मंगेश  पाटील (२३, रा. निखिल पार्क, अंबड लिंकरोड,  कामटवाडे) व करण संजय जायभावे (२२, शिवाजीनगर ,सातपूर ,नाशिक ) अशी मयत तरुणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबडच्या कामटवाडे येथील अर्णव मंगेश पाटील व सातपूर शिवाजीनगर येथील करण संजय जायभावे  हे दोघे तरून मंगळवारी रात्री घराबाहेबर पडल्यानंतर रात्रभर मित्रांसोबत होते. ते बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मायको सर्कलकडून सीबीएसकडे जात असताना दुचाकीचालक अर्णव पाटील याचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी भगधाव वेगात दुभाजकावर आदळली. या  अपघातात दुचाकी (एमएच १५ जीएस ८०६५)चालक अर्णव मंगेश पाटील (२३,रा.निखिल पार्क) याचा मृत्यू झाला असून मागे बसलेला करण संजय जायभावे यालाही अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच सरकार वाडा पोलिस ठाण्यातील पथकाने घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two killed as two-wheeler collides with divider in Nashak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.