Raj Thackeray: “१०० वर्ष एकच ध्यास, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज”; राज ठाकरेंची बाबासाहेबांना आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 06:40 PM2022-11-15T18:40:39+5:302022-11-15T18:41:17+5:30

Raj Thackeray: बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, या शब्दांत राज ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.

mns chief raj thackeray tribute to babasaheb purandare on his first remembrance | Raj Thackeray: “१०० वर्ष एकच ध्यास, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज”; राज ठाकरेंची बाबासाहेबांना आदरांजली

Raj Thackeray: “१०० वर्ष एकच ध्यास, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज”; राज ठाकरेंची बाबासाहेबांना आदरांजली

googlenewsNext

Raj Thackeray: मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार, वक्ते आणि शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचा पहिला स्मृतिदिन आहे. गेल्या वर्षी वयाच्या १०० व्या वर्षी बाबासाहेब पुरंदरे यांनी जगाचा निरोप घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली आहे.  

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणतात की, बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणं आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची. ही उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही

छत्रपती शिवाजी महाराज हा विचार घराघरात पोहचवणं हेच जगणं मानणाऱ्या बाबासाहेबांना हयातीतच नको तो मनस्ताप झेलावा लागला, पण त्यावर त्यांनी अवाक्षर काढलं नाही. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. ‘ह्या सम होणे नाही’, असं आपण सहजपणे म्हणतो, खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, पण त्याच वेळेला असं देखील वाटतं माझ्या पिढीचं ठीक आहे पण पुढच्या पिढ्याना अस्सल आणि उत्तुंग व्यक्तिमत्व  कशी बघायला मिळणार?
असो, काळ हेच त्यावरचं उत्तर आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनी, त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, या शब्दांत राज ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mns chief raj thackeray tribute to babasaheb purandare on his first remembrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.