Kolhapur: पतीच्या फेसबुकवर अश्लील मेसेज टाकून महिलेची बदनामी, पाच लाखांची मागणी; संशयितास अटक

By उद्धव गोडसे | Published: April 8, 2024 04:47 PM2024-04-08T16:47:18+5:302024-04-08T16:48:23+5:30

कोल्हापूर : महिलेच्या पतीच्या फेसबुक खात्यावर अश्लील मेसेज करून पाच लाखांची मागणी करणाऱ्या आणि पाठलाग करून महिलेचा विनयभंग करणाऱ्या ...

Woman defamed by posting obscene messages on husband's Facebook, Suspect arrested in Kolhapur | Kolhapur: पतीच्या फेसबुकवर अश्लील मेसेज टाकून महिलेची बदनामी, पाच लाखांची मागणी; संशयितास अटक

Kolhapur: पतीच्या फेसबुकवर अश्लील मेसेज टाकून महिलेची बदनामी, पाच लाखांची मागणी; संशयितास अटक

कोल्हापूर : महिलेच्या पतीच्या फेसबुक खात्यावर अश्लील मेसेज करून पाच लाखांची मागणी करणाऱ्या आणि पाठलाग करून महिलेचा विनयभंग करणाऱ्या संशयितास राजारामपुरी पोलिसांनी काल, रविवारी (दि. ७) रात्री अटक केले. शुभम सदाशिव खेतल (वय २७, रा. बागल चौक, कोल्हापूर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधित त्याने महिलेस त्रास दिला.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शुभम खेतल हा एका महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. महिलेने दुर्लक्ष केल्यानंतर त्याने तिच्या पतीच्या फेसबुक खात्यावर अश्लील मेसेज करून तिची बदनामी केली. तसेच पतीकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. 

पीडित महिला दुकानाकडे जाताना तिच्या दुचाकीचा पाठलाग करून वाटेत अडवून विनयभंग केला. सोशल मीडियात बदनामी करून तुझी वाट लावतो, अशी धमकी दिली. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी खेतल याला अटक केली असून, त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

Web Title: Woman defamed by posting obscene messages on husband's Facebook, Suspect arrested in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.