जळगाव बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली; वांग्याचे भाव निम्म्याने आले खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:00 PM2018-11-22T12:00:34+5:302018-11-22T12:02:16+5:30

फळे/भाज्या : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Vegetable increase in Jalgaon market; Below is half the size of the brinjal | जळगाव बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली; वांग्याचे भाव निम्म्याने आले खाली

जळगाव बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली; वांग्याचे भाव निम्म्याने आले खाली

googlenewsNext

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत वांग्याच्या भावात ४०० रुपये प्रतिक्विंटलने घट होऊन वांगे ९०० रुपये प्रतिक्विंटलवरून ५०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत.   सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भावदेखील कमी झाले आहेत. 

तीन आठवड्यांपूर्वी केवळ २२ क्विंटल वांग्याची आवक झाली होती.  त्यामुळे भाववाढ होऊन ते १२०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले होते; मात्र या आठवड्यात वांग्याची आवक वाढून गेल्या आठवड्यात ९०० रुपये प्रतिक्विंटल असले८२ वांग्यांचे भाव थेट ४००  रुपयांनी घटले आहेत.  अशाच प्रकारे गेल्या आठवड्यापेक्षा  कांद्याचे भाव कमी होऊन ते २०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. कोथिंबिरीचेही भाव ५०० रुपये प्रतिक्विंटलने कमी होऊन ते २५०० रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत.

Web Title: Vegetable increase in Jalgaon market; Below is half the size of the brinjal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.