चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 09:41 AM2024-05-18T09:41:58+5:302024-05-18T09:42:16+5:30

इतकेच नाही तर मृत मुलाचा छोटा भाऊही काही दिवसांपूर्वी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता.

Suspicious death of a 5-year-old boy in Uttar Pradesh's Muzaffarnagar | चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?

चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?

मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर इथं एका घटनेनं खळबळ माजली आहे. याठिकाणी ५ वर्षीय मुलाचा मृतदेह त्याच्याच घरी संशयास्पदरित्या आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा तिथे तंत्रमंत्र करणारं साहित्य सापडलं. त्यासोबतच एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली त्यात ७ शब्द लिहिले होते. सध्या या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. 

मुजफ्फरनगरच्या कैलावडा गावात ही घटना घडली. शुक्रवारी दुपारी पोलिसांना गावात राहणाऱ्या तेजपाल नावाच्या युवकाने ही माहिती दिली. सूचना मिळताच अधिकारी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहचले. तिथे ५ वर्षीय मुलाचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. पोलीस अधिकारी म्हणाले की, मृतदेहाजवळ तंत्रमंत्रासाठी लागणारं साहित्य सापडले. तिथेच एक चिठ्ठी मिळाली. ज्यात आता शांती मिळाली, आत्म्याला शांती मिळो असं लिहिलं होते. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. त्यामुळे अघोरी कृत्यातून मुलाची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस याबाबत कुटुंबाची चौकशी करत आहेत. 

इतकेच नाही तर मृत मुलाचा छोटा भाऊही काही दिवसांपूर्वी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. आता पोलीस या दोन्ही घटनांचा बारकाईने तपास करत आहेत. कैलवाडा गावातील ओमपाल यांच्या ५ वर्षीय मुलाचा मृताचा मृतदेह संशयस्पादरित्या आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला, त्यानंतर चौकशीला सुरुवात केली आहे. पोलिसांना घरात एक चिठ्ठी आणि तंत्रमंत्रासाठी लागणारं साहित्य सापडले. प्रथमदर्शनी अघोरी कृत्यातून मुलाची हत्या झाली असावी असा अंदाज आहे. मुलाचा मृतदेह त्याच्या घरातच सापडल्याने कुटुंबातील लोक यात सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर पुढील तपासाआधारे कारवाई केली जाईल अशी माहिती एसपी सत्यनारायण प्रजापत यांनी दिली.
 

Web Title: Suspicious death of a 5-year-old boy in Uttar Pradesh's Muzaffarnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.