फ्रान्सचे सलग तिस-या विजयाचे लक्ष्य, होंडुरसविरोधात लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:30 AM2017-10-14T02:30:18+5:302017-10-14T02:30:28+5:30

नॉकआऊटमध्ये आपली जागा पक्की केलेला फ्रान्सचा संघ होंडुरसविरोधात उद्या ग्रुप ई मध्ये खेळणार आहे. साखळी फेरीत सलग तिसरा सामना जिंकण्याचे फ्रान्सच्या संघाचे लक्ष्य आहे.

 France's third consecutive victory targets against Honduras | फ्रान्सचे सलग तिस-या विजयाचे लक्ष्य, होंडुरसविरोधात लढत

फ्रान्सचे सलग तिस-या विजयाचे लक्ष्य, होंडुरसविरोधात लढत

Next

गुवाहाटी : नॉकआऊटमध्ये आपली जागा पक्की केलेला फ्रान्सचा संघ होंडुरसविरोधात उद्या ग्रुप ई मध्ये खेळणार आहे. साखळी फेरीत सलग तिसरा सामना जिंकण्याचे फ्रान्सच्या संघाचे लक्ष्य आहे.
सलग दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर फ्रान्सचा संघ उपउपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. संघाने आपला पहिला सामना न्यू कॅलिडोनियाविरोधात ७-१ असा जिंकला. त्यानंतर जापानवर २-१ ने विजय मिळवला. होंडुरसला पराभूत केल्यानंतर फ्रान्सचा संघ गटात अव्वलस्थानी कायम राहील, त्यामुळे हा संघ अंतिम १६ मध्ये पदक तालिकेत सर्वात खालच्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल.
फ्रान्सचा अमिन गोइरी फॉर्ममध्ये आहे. त्याने याआधीच्या सामन्यात न्यू कॅलिडोनिया आणि जापानविरोधात प्रत्येकी दोन गोल केले आहेत. उद्याच्या सामन्यात फ्रान्सचा संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे यात शंका नाही.
दुसरीकडे होंडुरसला विजयासाठी चमत्कार दाखवण्याची गरज आहे. होंडुरसने न्यू कॅलिडोनियाला ५-० ने पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. कार्लोस मेजिया आणि पॅट्रिक पालासिओस यांनी न्यू कॅलिडोनियाविरोधात प्रत्येकी दोन गोल केले. त्यामुळे संघाला चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. उद्याच्या सामन्यात कमी अंतराने झालेला पराभवदेखील होंडुरसला बाद फेरीत जागा मिळवून देऊ शकतो.

Web Title:  France's third consecutive victory targets against Honduras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.