एकनाथ खडसे यांनी केली धुळ्यात अमळनेरच्या ‘अन्याय’ रिक्षातून सवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 06:54 PM2018-02-15T18:54:40+5:302018-02-15T18:56:16+5:30

अन्यायाची भावना : जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह जनमानसात चर्चा 

Eknath Khadse rides from 'Anil' rickshaw in Dhanmondi | एकनाथ खडसे यांनी केली धुळ्यात अमळनेरच्या ‘अन्याय’ रिक्षातून सवारी

एकनाथ खडसे यांनी केली धुळ्यात अमळनेरच्या ‘अन्याय’ रिक्षातून सवारी

Next
ठळक मुद्देविखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याबाबत न्याय मिळविण्यासाठी आत्महत्या करावी लागल्याची बाब दुर्दैवी आहे. मृत्यूनंतरही का होईना त्यांना सरकारने ५४ लाखांची मदत केली. यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो. मात्र पुन्हा अशा पद्धतीने दुसºया कोणत्या शेतकºयाची गत धर्मा पाटील यांच्यासारखी होऊ नये, यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मतही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथील दौºयात व्यक्त केले. शेतकºयांसाठी तापी नदीवर सारंगखेडा, सुलवाडे व प्रकाशा बॅरेजेस बांधून तयार आहेत मात्र, त्यातील पाणी अद्याप शेतीबांधापर्यंत पोहचले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी शहरात येऊन मागे अन्याय फलक लिहिलेल्या रिक्षातून शहरातून सैर केली. त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना येथील कार्यकर्त्यांसह जनमानसातही असून तशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली. या दौºयात त्यांनी पक्षाचे दिवंगत कार्यकर्ते तुषार सराफ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
बुधवारी दुपारी सव्वाचार वाजता माजी मंत्री खडसे शहरात दाखल झाले. सध्या ते जेथे जातील तेथे अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवत आहेत. तीच भावना कार्यकर्त्यांचीही असून त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी अमळनेर येथील कैलास चौधरी यांच्या रिक्षातून सवारी करत यावेळी शहरात फेरफटकाही मारला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर त्यांच्यासोबत  होते. चौधरी यांनी रिक्षाच्या मागे माजी मंत्री खडसे यांचे छायाचित्र व त्यावर अन्याय असे लिहिलेला फलकही लावला आहे. त्यामुळे या रिक्षातून प्रवास करताना त्यांच्यावरील अन्यायाची कार्यकर्त्यांमधील भावना अधोरेखीत झाली. नागरिकांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर त्यांनी आमदार अनिल गोटे यांनी साकारलेल्या शिवतीर्थास भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तेजस गोटे यांनी त्यांचे स्वागत केले. पक्षाचे शहरातील दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते तुषार सराफ यांच्या डोंगरे महाराज नगरातील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नेरकर, भिमसिंग राजपूत, डॉ.माधुरी बोरसे, डॉ.विपुल बाफना, भारती माळी, रत्ना बडगुजर, योगेश मुकुंदे,किरण देशमुख, अमित खोपडे, चंद्रकांत गुजराथी, अमोल मराठे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
पक्षाचे येथील माजी जिल्हाध्यक्ष विनोद मोराणकर यांच्या घरी जाऊन माजी मंत्री खडसे यांनी त्यांची भेट घेतली. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते जळगावकडे रवाना झाले. 

Web Title: Eknath Khadse rides from 'Anil' rickshaw in Dhanmondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.