दोन रेल्वे रद्द, खाजगी बसगाड्या निम्म्यावर, मुंबईच्या विमानाला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:23 PM2019-07-02T23:23:59+5:302019-07-02T23:24:28+5:30

मुंबईत बरसणाऱ्या पावसामुळे मंगळवारी औरंगाबादहून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. मुंबईहून येणारी आणि मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस रद्द झाली. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावली. याबरोबर मुंबईतील पावसामुळे अनेकांनी प्रवास टाळल्याने एसटी आणि खाजगी बसच्या संख्येवरही परिणाम झाला. त्याबरोबर मुंबईहून येणाºया विमानालाही दोन तास विलंब झाला.

Two trains canceled, half of the private bus, delayed by the Mumbai flight | दोन रेल्वे रद्द, खाजगी बसगाड्या निम्म्यावर, मुंबईच्या विमानाला विलंब

दोन रेल्वे रद्द, खाजगी बसगाड्या निम्म्यावर, मुंबईच्या विमानाला विलंब

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतील पावसाचा परिणाम : प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

औरंगाबाद : मुंबईत बरसणाऱ्या पावसामुळे मंगळवारी औरंगाबादहून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. मुंबईहून येणारी आणि मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस रद्द झाली. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावली. याबरोबर मुंबईतील पावसामुळे अनेकांनी प्रवास टाळल्याने एसटी आणि खाजगी बसच्या संख्येवरही परिणाम झाला. त्याबरोबर मुंबईहून येणाºया विमानालाही दोन तास विलंब झाला.
मुंबई परिसरातील जोरदार पावसामुळे आणि सोमवारी मुंबई-पुणेदरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे अनेक रेल्वेंवर परिणाम झाला. यामुळे २ जुलै रोजी सुटणाºया मुंबई-नांदेड-मुंबई या दोन्ही तपोवन एक्स्प्रेस (१७६१७-१७६१८) रद्द करण्यात आल्या. तसेच १ जुलैला सुटलेली नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (११४०२) नाशिकपर्यंतच धावली. २ जुलैला सुटणारी मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेसही (११४०१) नाशिक येथूनच सोडण्यात आली.
१८ बोगींच्या तपोवन एक्स्प्रेसने औरंगाबादहून दररोज तीनशे ते चारशे प्रवासी मुंबईला जातात. मुंबईतील पावसामुळे रेल्वे रद्द झाल्याची माहिती अनेक प्रवाशांपर्यंत पोहोचलेली नव्हती. त्यामुळे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अनेक प्रवासी रेल्वेस्टेशनवर दाखल झाले होते. मात्र, याठिकाणी आल्यानंतर रेल्वे रद्द झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे रेल्वेस्टेशनहून माघारी फिरण्याची वेळ अनेकांवर आली. रेल्वे रद्द झाल्याने अनेकांनी तिकीट रद्द करून रिफं ड घेण्यासाठी आरक्षण कार्यालयात गर्दी केली होती. मुंबईला जाणे आवश्यक असल्याने अनेक जण खाजगी बसकडे वळले. मात्र, याठिकाणी अधिक रक्कम मोजावी लागत असल्याचा अनुभव अनेकांना आला.
प्रवासी घटले
एसटी महामंडळाच्या मुंबईसाठी पाच बस धावतात. पावसाळ्यात एसटी प्रवासी संख्येवर परिणाम होत असतो. त्यात मुंबईत पाऊस सुरू असल्याने मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या कमी झाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. औरंगाबादहून दररोज ३० खाजगी बस मुंबईला जातात; परंतु ही संख्या अर्धी झाल्याची माहिती औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे राजन हौजवाला यांनी दिली.
विमानाला उशीर
एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान दुपारी ३.२५ वा. उड्डाण करते. सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास हे विमान औरंगाबादला येते; परंतु या विमानाला जवळपास दोन तास विलंब झाल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाºयांनी दिली.

Web Title: Two trains canceled, half of the private bus, delayed by the Mumbai flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.