रेल्वे फाटक दुचाकी वाहनावर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:45 PM2017-08-22T23:45:42+5:302017-08-22T23:46:39+5:30

मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गोंदिया-चंद्रपूर रेल्वे क्रासिंगवरचे फाटक अचानक दुचाकी वाहनावर कोसळले. सुदैवाने ‘ते’ प्रवासी थोडक्यात बचावले.

 Railway gate collapsed on two-wheelers | रेल्वे फाटक दुचाकी वाहनावर कोसळले

रेल्वे फाटक दुचाकी वाहनावर कोसळले

Next
ठळक मुद्दे‘ते’ वाहनधारक थोडक्यात बचावले : ब्रह्मपुरी येथे उड्डाणपुलाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गोंदिया-चंद्रपूर रेल्वे क्रासिंगवरचे फाटक अचानक दुचाकी वाहनावर कोसळले. सुदैवाने ‘ते’ प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेत एका दुचाकी वाहनाच्या हेड लाईटच्या काचा फुटल्याने नुकसान झाले.
गोंदिया-चंद्रपूर ५८८०२ या क्रमांकाची पॅसेंजर रेल्वेगाडी ब्रह्मपुरी रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर ब्रह्मपुरी-आरमोरी या राज्यमार्गावरील रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. रेल्वेगाडी चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाल्यानंतर रेल्वेफाटक उघडण्यात आले. परंतु रेल्वे फाटकचा एक गेट काही अंतरावर वर गेला असता अचानक तो वाकून लोंबकळू लागला. सुदैवाने यात तीन प्रवासी बचावले. पण रेल्वे फाटक वाकून एका प्रवाशाच्या दुचाकीच्या समोर पडल्याने दुचाकीचे हेडलाईट फुटले. वाकलेला फाटक थोडेसे मागे पडले असते तर कदाचित तो वाहनधारकाच्या डोक्यावर पडून गंभीर धोका निर्माण झाला असता, असे प्रत्यक्षदर्शी वाहनधारकांचे म्हणणे होते.
फाटक नेमके कशामुळे वाकले असेल, याचे कारण जरी समजले नसले तरी कदाचित फाटक गंजल्याने वाकले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या फाटकाची देखभाल ज्या संबंधीत विभागाकडे आहे, त्यांच्या ही बाब लक्षात येणे आवश्यक असतानाही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. तर दुसरीकडे वाहनधारक पूर्ण फाटक उघडण्यापूर्वीच घाईने वाहने काढण्यास सुरूवात करतात. त्यामुळे अशा प्रसंगाना तोंड द्यावे लागत असते. त्यामुळे वाहनधारकांनी नियम, शिस्त पाळणे आवश्यक आहे. या फाटकाजवळ वाहनांच्या रांगा लागत असतात. आता या घटनेमुळे उड्डाण पुलाची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळी फाटक वाकल्याची घटना घडताच आम्ही लगेच धाव घेतली. फाटक वाकल्याचे नेमके कारण माहिती नसून प्रवाश्यांनी शिस्त व नियमांचे उल्लंघन करु नये.
- निर्मलकुमार, उपरेल्वे अधीक्षक, ब्रह्मपुरी.

Web Title:  Railway gate collapsed on two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.