प्रकल्पबाधित युवकांना वीज केंद्रातील कंत्राटी कामात सामावून घ्यावे

By admin | Published: February 11, 2016 01:32 AM2016-02-11T01:32:17+5:302016-02-11T01:32:17+5:30

वीज केंद्रातील निर्माणाधीन संच कार्यान्वित झाल्यावर ते व्यवस्थापनाकडे संचालनाकरीता हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

Involve the project affected youth in contract work in the power station | प्रकल्पबाधित युवकांना वीज केंद्रातील कंत्राटी कामात सामावून घ्यावे

प्रकल्पबाधित युवकांना वीज केंद्रातील कंत्राटी कामात सामावून घ्यावे

Next

दोन नव्या संचाचे बांधकाम : स्थानिकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी
दुर्गापूर : वीज केंद्रातील निर्माणाधीन संच कार्यान्वित झाल्यावर ते व्यवस्थापनाकडे संचालनाकरीता हस्तांतरित करण्यात येणार आहेत. दरम्यान करण्यात येणाऱ्या कंत्राटी कामात दुर्गापूर, ऊर्जानगरातील स्थानिक प्रदूषण व प्रकल्प बाधित सुशिक्षित बेरोजगारांना आधी प्राधान्य देऊन यात सामावून घेण्याची मागणी येथील नागरिकांची केली आहे.
चंद्रपूर वीज केंद्रातील दोन नव्या संचाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्णत्वास आल्यावर संचालनाकरीता वीज केंद्र व्यवस्थापनास हस्तांतरीत करण्यात येणार आहे. संचाचे संचालन वीज केंद्राच्या कर्मचाऱ्याशिवाय कंत्राटी पद्धतीने कामाचे कंत्राट काढून कंत्राटदारामार्फत कंत्राटी कामगाराकडून करण्यात येणार आहे. याकरीता शेकडो कामगारांची गरज भासणार आहे. अशा कामगारांची दुर्गापूर-ऊर्जानगर (वस्ती) मधील प्रकल्पग्रस्त व मूळ निवासी असलेल्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांची भरती करण्याची गरज आहे. यापूर्वी वीज केंद्राच्या सातही संचामध्ये केलेल्या कंत्राटी कामगारांच्या भरतीत येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे आपल्या अंगणात असलेल्या वीज केंद्रात आपल्यालाच काम मिळत नसल्यामुळे येथील युवक वर्ग संतापला आहे.
परराज्यातून व पर जिल्ह्यातून येवून येथे बस्तान मांडलेले काही संधी साधू नेते मूळ निवासा व्यतिरिक्त लोकांकडून आधीच पैसे लाटून या कंत्राटी कामात सामावून घेण्याची त्यांना हमी देत आहेत. मात्र सात संचाच्या कंत्राटी कामात मूळ निवास्यांवर झालेला अन्याय आता या संचाच्या कंत्राटी कामात होणाऱ्या कामगार भरतीत खपवून घेणार नसल्याने बोलल्या जात आहे.
येथील दोन्ही ग्रामपंचायतीने संयुक्तरीत्या मुख्य अभियंत्यांना पत्र देऊन तशी आगाऊ मागणी केली आहे. यास त्यांनी आपली समर्थता दर्शविली आहे. सर्व समीप प्रकल्प बाधित सर्वाधिक प्रदूषणाची झळ सोसाणाऱ्या दुर्गापूर-ऊर्जानगरातील मूळ बेरोजगारांना कामगार भरतीत प्रथम प्राधान्य देण्याची एक अट मेन्टनन्स कामाच्या निघणाऱ्या निविदामध्येच टाकण्यात यावी, अशीही मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Involve the project affected youth in contract work in the power station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.