‘गाळयुक्त शिवार’ला प्रतिसाद, जिल्हाधिका-यांनी केली कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:52 AM2018-03-13T01:52:15+5:302018-03-13T01:52:15+5:30

रुईखेड मायंबा(जि.बुलडाणा) :  बुलडाणा तालुक्यातील ग्राम महोज येथे ९ मार्चपासून जैन संघटनेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलाम अभियान अंतर्गत आणि महाराष्ट्र  शासन राबवित असलेले गाळयुक्त शिवार या दोन्ही कामाची सुरुवात झाली असून, परिवारातील भडगाव, रुईखेड, सावळी आणि महोज या गावच्या शिवारातील शेतक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Responding to 'slurry shimmers', collector-cum-work surveyed | ‘गाळयुक्त शिवार’ला प्रतिसाद, जिल्हाधिका-यांनी केली कामाची पाहणी

‘गाळयुक्त शिवार’ला प्रतिसाद, जिल्हाधिका-यांनी केली कामाची पाहणी

Next
ठळक मुद्दे शेतक-यांचा प्रतिसाद वाढला!

लोकमत न्यूज नेटवर्क
रुईखेड मायंबा(जि.बुलडाणा) :  बुलडाणा तालुक्यातील ग्राम महोज येथे ९ मार्चपासून जैन संघटनेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलाम अभियान अंतर्गत आणि महाराष्ट्र  शासन राबवित असलेले गाळयुक्त शिवार या दोन्ही कामाची सुरुवात झाली असून, परिवारातील भडगाव, रुईखेड, सावळी आणि महोज या गावच्या शिवारातील शेतक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हाधिकारी डॉ.पुलकुंडवार, तहसीलदार सुरेश बगळे, मंडळ अधिकारी टेकाळे, मंडळ अधिकारी अशोक शेळके यांनी १२ मार्च रोजी भेट देऊन कामाची पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी शेतकºयांना मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी तलाठी संजय जगताप, तलाठी नारायण देठे, तलाठी किशोर कानडजे, तलाठी शिवाजी ताठे रुईखेड, मा. पोलीस पाटील समाधान उगले, पो.पा.ज्ञानेश्वर नेमणार, भडगाव सरपंच केशव साखरे, ग्रामसेवक इंगळे यांच्यासह दिनकर खडके, गजानन साबळे, संजय खेडेकर आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.
 
करडी धरणातील गाळ उपसा मोहिमेस प्रारंभ
 धाड :  भारतीय जैन संघटनेच्यावतीने बुलडाणा जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी नदी नाले व धरणे यांची खोलीकरण व गाळ उपसा मोहीम हाती घेण्यात आली. या पृष्ठभूमीवर आज सायंकाळी ५ वा. सुमारास उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या हस्ते करडी धरणाचे परिक्षेत्रात बानगंगा नदीपात्रात जेसीबी मशीनद्वारे गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी ए.एन.शेळके, टेकाळे, तलाठी किशोर कानडजे, विजय गवळी, धनंजय शेवाळे, शिवाजी ताठे, कोतवाल बापू तोटे हजर होते.

Web Title: Responding to 'slurry shimmers', collector-cum-work surveyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.