बुलडाणा जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:32 AM2018-03-13T00:32:32+5:302018-03-13T00:32:32+5:30

बुलडाणा : यावर्षी समाधानकारक पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच बाष्पीभवनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असून,  पाणी पुरवठा योजना असलेल्या प्रकल्प व धरणातील पाणीसाठा कमी-कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून, आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ८८ गावात खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

The number of scarcrassed villages increased in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

बुलडाणा जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

Next
ठळक मुद्देबाष्पीभवनाचा फटका १२ गावात टँकर तर ८८ गावात विहिरींचे अधिग्रहण

हर्षनंदन वाघ । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : यावर्षी समाधानकारक पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच बाष्पीभवनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असून,  पाणी पुरवठा योजना असलेल्या प्रकल्प व धरणातील पाणीसाठा कमी-कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून, आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ८८ गावात खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 
बुलडाणा जिल्ह्यातील मागील वर्षी शेवटी दमदार पावसाळा झाल्यामुळे उन्हाळ्यात काही गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती; मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पात अल्प जलसाठा आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच बाष्पीभवनामुळे काही प्रकल्पात आतापासून पाण्याचा ठणठणाट आहे, तर जमिनीखालील पाण्याची पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर २०१७ ते जून २०१८ नुसार कृती आराखडा प्रस्तावित केला होता. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ७९७ गावासाठी १ हजार १४८ उपाययोजना करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. यासाठी १८९४.२५ लक्ष रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी  १०५ गावातील १२७ उपाययोजनांसाठी १८०.२० लक्ष रुपयांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ९८ गावात ११९ उपाययोजना करण्यात आल्या असून, त्यासाठी ४४.४९ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपाययोजनांमध्ये ९८ गावात विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून, अडचणीच्या चिखली तालुक्यातील ३, देऊळगाव राजा तालुक्यातील ३, सिंदखेड राजा तालुक्यात १, खामगाव तालुक्यात २, शेगाव तालुक्यात १ व मोताळा तालुक्यातील २ अशा प्रकारे ६ तालुक्यातील १२ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या गावात सुरू आहे टँकरद्वारे पाणीपुरवठा
 जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आज रोजी १२ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात चिखली तालुक्यातील मेरा बु., चंदनपूर, रानअंत्री, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, नागणगाव, सरंबा, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव, खामगाव तालुक्यातील जळकातेली, लांजूड, शेगाव तालुक्यातील चिंचोली व मोताळा तालुक्यातील गुगळी, कोल्ही गवळी या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
 

Web Title: The number of scarcrassed villages increased in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.