उमेदवारांविरुद्ध मोबाईल अ‍ॅपवर करता येणार तक्रार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 02:51 PM2019-03-12T14:51:14+5:302019-03-12T14:53:18+5:30

खामगाव :  आपल्या मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती निवडणूक आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे.

Complaints can be made on the C Vigil mobile app! | उमेदवारांविरुद्ध मोबाईल अ‍ॅपवर करता येणार तक्रार!

उमेदवारांविरुद्ध मोबाईल अ‍ॅपवर करता येणार तक्रार!

Next

- योगेश फरपट
लोकमत न्युज नेटवर्क 
खामगाव :  आपल्या मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती निवडणूक आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. ‘सिव्हीआयजीआयएल’ असे अ‍ॅपचे नाव असून गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. या अ‍ॅपचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यात थेट तक्रार करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. 
निवडणूक काळात कुठेना कुठे आचारसंहितेचा भंग होतो. अनेक नागरिकांना त्याची माहिती असते. त्यांची तक्रार करायची इच््छा असूनही  तक्रार करण्याची प्रक्रिया किचकट असल्याने अनेकजण पुढे येत नसत. त्यामुळे संबधित गुन्हा हा दडपला जायचा. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने मोबाईल अ‍ॅप लॉंच केले आहे. हे अ‍ॅप कुणीही गुगल प्लेस्टोरमधून  डाऊनलोड करू शकतो. ‘सिव्हीआयजीआयएल’ हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर या अ‍ॅपमध्ये  मोबाईल नंबरसह काही माहिती भरावी लागेल. त्यानंतर याची अधिकृत नोंदणी होईल. त्यात आवश्यक माहिती भरायची आहे. 
या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपल्या परिसरात होणाºया आदर्श आचारसंहितेच्या भंग चे फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकतो. या अ‍ॅपमधून सरळ फोनचा कॅमेरा ओपन करून व्हिडिओ रेकॉर्डही करू शकता किंवा फोटो क्लिक करून तो निवडणूक आयोगाला पाठवण्याची सोय या अ‍ॅपमध्ये आहे. या अ‍ॅपमधून निवडणूक आयोगाला लोकेशनची माहितीही देवू शकता येते. कोणत्या ठिकाणी उमेदवारांकडून नियमांचा भंग होत आहे हे सर्व रेकॉर्ड करता येवू शकते. 
पारदर्शक प्रक्रिया 
या अ‍ॅपमध्ये एक डिस्क्रिप्सन बॉक्स असून यात मतदार काही माहिती टाईप करू शकतात. यात किती जणांनी तक्रार केली? किती तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली? हे सर्व मतदारांना दिसू शकणार आहे. तक्रारकर्त्या व्यक्तीचे नाव गोपनिय राहणार असून नागरिकांनी आचारसंहिता भंग, नियमांचे उल्लंघन आदी संबधित गुन्हयांची माहिती अ‍ॅपद्वारे देवून सहकार्य करावे असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. 

 १०० मिनिटात तक्रारीचे निवारण 
निवडणूक आयोगाच्या ‘सिव्हीआयजीआयएल’या अ‍ॅपवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. प्रथम ती माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडे येईल. त्यानंतर ती संबधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे फॉरवर्ड केली जाईल. तक्रारीनंतर १०० मिनिटांच्या आत यावर संबधित क्षेत्राचे निवडणूक अधिकारी कारवाई करतील. त्यावर जिल्हा निवडणूक अधिकाºयांचे नियंत्रण असणार आहे. 
- गौरी सावंग, उप-जिल्हा निवडणूक अधिकारी, बुलडाणा. 
 
खामगावात १३ पथके कार्यान्वीत 
खामगाव मतदारसंघात १३ पथके कार्यान्वीत करण्यात आली असून कुठेही आचारसंहितेचा भंग होत असेल तर नागरिक अ‍ॅपवर तक्रार नोंदवू शकतात. - शीतल रसाळ, तहसिलदार, खामगाव.

Web Title: Complaints can be made on the C Vigil mobile app!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.