बुलडाणा : औरंगाबाद मार्गावर बस व दुचाकीची धडक, दोन जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 08:18 PM2017-12-25T20:18:28+5:302017-12-25T20:20:20+5:30

धाड: वाहनास भरधाव वेगात ओव्हरटेक करताना समोरून येणा-या एस.टी.बसला धक्का लागून दुचाकीवरील दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ च्या सुमारास औरंगाबाद रोडवरील सहकार विद्या मंदिराजवळ घडली. 

Buldhana: A bus and a two wheeler hit on the road of Aurangabad, two seriously injured | बुलडाणा : औरंगाबाद मार्गावर बस व दुचाकीची धडक, दोन जण गंभीर

बुलडाणा : औरंगाबाद मार्गावर बस व दुचाकीची धडक, दोन जण गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देओव्हरटेक करित असताना विरुद्ध दिशेने येणा-या बसचा लागला धक्कासहकार विद्या मंदिरजवळील घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड: वाहनास भरधाव वेगात ओव्हरटेक करताना समोरून येणा-या एस.टी.बसला धक्का लागून दुचाकीवरील दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ च्या सुमारास औरंगाबाद रोडवरील सहकार विद्या मंदिराजवळ घडली. 
प्राप्त माहितीनुसार नाशिक शेगाव बस क्र.एम.एच.११ बी.झेड.९२४६ ही औरंगाबाद कडून येताना समोरून दुचाकीस्वार हे एम.एच.२० बी.झेड. ६४३८ बजाज डिस्कवरव वरून वाहनास ओव्हरटेक करण्याचे घाईत सरळ बसवर आले. दरम्यान बसच्या चालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु बसचा एक कोपरा लागल्याने दुचाकीस्वार अपघाती जखमी झाले. सदर दुचाकीस्वार हे ग्राम कुलमखेड येथील असून संतोष तोताराम शिंदे व समाधान ओंकार बोरकर अशी जखमींची नावे आहेत. जखमींना नागरीकांनी प्रथम ग्रामीण रूग्णालय धाड नंतर पुढील उपचारार्थ बुलडाणा येथे रवाना केले आहे. याबाबत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नोंद घेतली आहे. अद्यापपर्यंत याप्रकरणी पुढील कारवाई सुरूच होती. तपास पीएसआय अशोक रोकडे करत आहे.

Web Title: Buldhana: A bus and a two wheeler hit on the road of Aurangabad, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.