पोलिसांच्या वाहनाने उडविल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:09 PM2019-04-24T23:09:08+5:302019-04-24T23:09:34+5:30

पोलिसांच्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या १७ वर्षीय महाविद्यालययीन तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात २२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास आमखास मैदानाजवळील जिल्हा क्षयरोग रुग्णालयासमोर घडला.

17-year-old woman dies after police vehicle blows | पोलिसांच्या वाहनाने उडविल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

पोलिसांच्या वाहनाने उडविल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देआमखास मैदानाजवळील अपघात : उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात रात्री झाला अंत

औरंगाबाद : पोलिसांच्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या १७ वर्षीय महाविद्यालययीन तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात २२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास आमखास मैदानाजवळील जिल्हा क्षयरोग रुग्णालयासमोर घडला.
आकेफा मेहरीन मोहंमद जहीर (वय १७, मूळ रा. नांदेड, ह.मु. आरेफ कॉलनी, औरंगाबाद), असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आकेफा ही २२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मोपेडने जामा मशिदीकडून टाऊन हॉलकडे जात होती. टाऊन हॉल उड्डाणपुलाच्या अलीकडे जिल्हा क्षयरोग रुग्णालयासमोरून जात असताना मागून आलेल्या कारने आकेफाला धडक दिली. या अपघातात आकेफा गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली. या घटनेनंतर तिला उडविणाऱ्या वाहनाचा चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह तेथून पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी जखमी आकेफाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना बुधवारी (दि.२४) रात्री २ वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. आज सकाळी आकेफा हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आला. तेव्हा तेथे आकेफाचे नातेवाईक आक्रमक झाले. पोलिसांच्या वाहनाने आकेफाला उडविले असून, अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला. आरोपी वाहनचालकास तातडीने अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.
याबाबत माहिती कळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब सिनगारे, सहायक पोलीस निरीक्षक एस.के. खताने, उपनिरीक्षक अनंता तांगडे आदींनी घाटी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची समजूत काढली. या घटनेची चौकशी सुरू असून, अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सिनगारे यांनी सांगितले. अपघात करणारा कोणीही असो, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याने नातेवाईक शांत झाले.

चौकट
आकेफाला उडविणारे वाहन पोलिसांचे
आकेफा हिला उडवून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले वाहन पोलिसांचे असल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. आकेफा हिला उडविणाºया वाहनाचा चालक पोलिसांच्या युनिफॉर्मवर होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असल्याचे पोलीस निरीक्षक सिनगारे यांनी सांगितले. दरम्यान, आकेफाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यविधीसाठी नातेवाईक नांदेडला रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 17-year-old woman dies after police vehicle blows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.