मध्य रेल्वेला मालवाहतुकीतून ८०२ कोटींची कमाई, गेल्या वर्षीच्या तुलनेत २६.१० टक्के वाढ

By गणेश वासनिक | Published: November 13, 2023 05:24 PM2023-11-13T17:24:59+5:302023-11-13T17:26:39+5:30

ऑक्टोबर महिन्यात ७.३५ दशलक्ष टन मालवाहतूक

802 crores revenue to Central Railway from freight | मध्य रेल्वेला मालवाहतुकीतून ८०२ कोटींची कमाई, गेल्या वर्षीच्या तुलनेत २६.१० टक्के वाढ

मध्य रेल्वेला मालवाहतुकीतून ८०२ कोटींची कमाई, गेल्या वर्षीच्या तुलनेत २६.१० टक्के वाढ

अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने गत ऑक्टाेबर महिन्यात मालवाहतुकीतृून ८०२ कोटींची कमाई झाल्याची नोंद केली आहे. एकूण ७.३५ दशलक्ष टन मालवाहतुकीद्वारे रेल्वेच्या उत्पन्नात मागील तुलनेत चार टक्क्यांनी वाढ केली आहे. ऑक्टोबरच्या कोणत्याही महिन्यामध्ये हे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक ओरिजिनेट लोडिंग गणले गेले आहे.

८०२ कोटींच्या मालवाहतुकीसह मध्य रेल्वेने ऑक्टोबर-२०२३ मध्ये ७.३५ दशलक्ष टन इतके सर्वोत्तम मालवाहतूक लोडिंग मध्य रेल्वेचे ऑक्टोबर-२०२३ महिन्यात ७.३५ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. ऑक्टोबर-२०२२ महिन्यातील ५.९७ दशलक्ष टन लोडिंगच्या तुलनेत २३.०१ टक्के अधिक आहे. मध्य रेल्वेने महिन्याचे ७.०७ मेट्रिक टनांचे उद्दिष्ट ओलांडले जे ४ टक्क्यांची वाढ दर्शवित आहे. ही ऑक्टोबरच्या कोणत्याही महिन्यातील सर्वोत्तम लोडिंग आहे. मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ व पुणे या पाचही विभागांत मालवाहतुकीतून ८०२ कोटींची कमाई झाली आहे.

मध्य रेल्वेने एप्रिल-ऑक्टोबर २०२३-२४ या कालावधीसाठी ४९.०३ मेट्रिक टन लोडिंग नोंदविले आहे. जे एप्रिल ते ऑक्टोबर -२०२२ मध्ये ४३.९८ मेट्रिक टन होते. त्यात ११.५० टक्के वाढ झाली आहे, हे देखील मध्य रेल्वेवर ऑक्टोबर ते एप्रिलच्या कालावधीसाठी वार्षिक मूळ लोडिंग आहे.

नेट टन किलोमीटर ऑक्टोबर-२०२३ मध्ये ३३५९ दशलक्ष झाले. जे ऑक्टोबर-२०२२ मधील ४३८६ दशलक्षच्या तुलनेत २१.९० टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबर-२०२२ मधील ६३६ कोटींच्या तुलनेत ऑक्टोबर २०२३ मध्ये ८०२ कोटी रुपयांचा मालवाहतूक महसूल मिळविले आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत २६.१० टक्के जास्त आहे.

Web Title: 802 crores revenue to Central Railway from freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.