शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

होय, काँग्रेस नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला

By admin | Updated: May 23, 2014 00:13 IST

काँग्रेसमधील प्रवाह थांबला आहे, नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी झाला आहे, पक्षात नव्याने येणार्‍यांची संख्याही घटली आहे. हीच कारणे लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी कारणीभूत ठरली,

आमदार-पदाधिकार्‍यांची कबुली : लोकसभेतील पराभवाची मुंबईत कारणमीमांसा

यवतमाळ : काँग्रेसमधील प्रवाह थांबला आहे, नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी झाला आहे, पक्षात नव्याने येणार्‍यांची संख्याही घटली आहे. हीच कारणे लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी कारणीभूत ठरली, अशा शब्दात जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी मुंबईत कबुली दिली. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे ९२ हजार मतांनी पराभूत झाले. काँग्रेसचा बालेकिल्ला असताना शिवसेनेच्या भावना गवळी निवडून आल्या. विशेष असे काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघातच शिवसेनेला सर्वाधिक मते मिळाली. या पार्श्वभूमीवर मोघेंच्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी बुधवार २१ मे रोजी मुंबईत जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक बोलविण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे असताना काँग्रेस उमेदवाराचा लोकसभेत पराभव का झाला याच्या कारणांवर चर्चा झाली. प्रत्येक आमदार व पदाधिकार्‍यांनी आपली बाजू मांडली. त्यात प्रकर्षाने कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय पुढे आला. काँग्रेसमध्ये वर्षानुवर्षे विशिष्टच लोक मंत्री, आमदार, पदाधिकारी राहत आहे. त्यांच्या खात्यातही बदल होत नाही. आपला वारसा कार्यकर्त्याकडे सोपविण्याऐवजी घरातीलच व्यक्तीकडे सोपविला जातो. पक्षात संपर्क राहिला नाही, पक्षातील प्रवाह जणू थांबला आहे. वरचे लोक वर आणि खालचे कार्यकर्ते खाली अशी स्थिती आहे. पक्षात नव्याने येणार्‍यांची संख्या थांबली आहे. काही विशिष्ट लोकांनी आपल्या जागा फिक्स केल्या आहेत, आदीबाबी चर्चेतून पुढे आल्या. उपस्थित आमदारांनीही ही कारणे मान्य केली. काँग्रेसच्या पराभवाला खिळखिळे झालेले पक्ष संघटन यासोबतच भाजपासोबत राहिलेला मीडिया, त्याचा ग्रामीण मतदारांवर पडलेला प्रभाव, सत्तेतील सहकारी पक्ष राष्टÑवादी काँग्रेसने काम न केल्याबाबत अनेक भागातून आलेल्या तक्रारी हीसुद्धा कारणे तेवढीच महत्वाची ठरल्याचे सांगितले गेले. या सर्व तक्रारी व पराभवाची कारणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी मार्गदर्शन केले. पराभवाच्या कारणांचा फार विचार न करता सकारात्मक दृष्टीने विधानसभा निवडणुकांची तयारी करा, असा सल्ला वजा आदेश ठाकरे यांनी उपस्थितांना दिला. शासनाच्या अनेक योजना चांगल्या आहेत, मात्र त्याची जनजागृती व अंमलबजावणी झाली नसल्याची बाब यावेळी मांडण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शेतकरी, कर्ज, व्याजदर, अनुदानाच्या लाभार्थ्यांना अद्यापही न मिळालेल्या रकमा, कापसाचे दर, सिंचन, अन्न सुरक्षा योजना, जीवनदायी योजना यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. लोकसभेत पराभव झाला मात्र आता विधानसभेचा विचार करा, भविष्यात काय करायचे हे ठरवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित आमदार व पदाधिकार्‍यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)