शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळची कोरोना लॅब तपासणीत दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 14:06 IST

Corona lab, Yawatmal News मराठवाडा व विदर्भातील ३५ लॅबमध्ये यवतमाळच्या लॅबने तपासणीत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

ठळक मुद्दे‘एम्स’च्या सॅम्पल टेस्टींगमध्ये १०० टक्के मॅच ५० हजारांचा टप्पा ओलांडला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३ जून २०२० रोजी कोरोना तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली. या प्रयोगशाळेने निर्मितीपासून २८ सप्टेंबरपर्यंत ५० हजार नमुन्यांची यशस्वी तपासणी केली. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) नागपूरच्या अंतर्गत ही लॅब कार्यान्वित आहे. मराठवाडा व विदर्भातील ३५ लॅबमध्ये यवतमाळच्या लॅबने तपासणीत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.यवतमाळच्या लॅबने तपासलेले नमूने खरंच बरोबर आहेत काय, याची पडताळणी करण्यासाठी नागपूर ‘एम्स’कडे पाठविले होते. १५ नमूने पॉझिटिव्ह व १५ नमूने निगेटिव्ह होते. या सर्व नमुन्यांची पुन:पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये १०० टक्के अहवाल बरोबर आला. अहोरात्र सुरू असलेल्या यवतमाळ मेडिकलमधील कोरोना लॅबने २८ सप्टेंबरपर्यंत ५० हजार नमूने तपासले आहे. लॅबकडे असलेली साधन सुविधा व इतर बाबींचा विचार करून ‘एम्स’ने यवतमाळ कोरोना लॅबला दुसरा क्रमांक दिला. पहिला क्रमांक नागपूरच्या लॅबला देण्यात आला.

येथील कोरोना लॅबमध्ये आवश्यक तंत्रज्ज्ञांची पदे मंजूर झाली नाहीत. तुटपुंज्या पदांवर लॅबचे काम अहोरात्र सुरू आहे. आता तर लॅबमधील तीन तंत्रज्ज्ञ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आधीच कमी तंत्रज्ज्ञांच्या भरवशावर सुरू असलेले काम आणखीच अडचणीत आले आहे. लॅबचे प्रमुख डॉ. विवेक गुजर यांच्या मार्गदर्शनात कामकाज सुरू आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस