शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये रॅगिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:11 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे.

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला वरिष्ठ विद्यार्थ्यांनी पाच दिवस मारहाण केली. या विद्यार्थ्याने आपली सुटका करून घेत घर गाठले. त्यानंतर शुक्रवारी पालकासह तक्रार देण्यास आलो असता महाविद्यालय प्रशासनाने दखल घेतली नाही, असा दावा त्याने केला आहे.अभिषेक असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने ८ आॅगस्टला मेडिकलच्या वसतिगृहात प्रवेश घेतला. पहिल्या दिवसापासून वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून त्याला त्रास दिला जात होता. १२ आॅगस्टला मनीष वासेकर, प्रतीक चव्हाण, बालाजी श्रीरामे, प्रशांत तुरपटवार, शंतनू ढोकणे, मिलिंद गरपिंडे या सहा जणांनी तब्बल त्याला सहा तास गुडघ्यावर बसायला भाग पाडले. नंतर त्यापैकी तिघांनी त्याला १३ आॅगस्टच्या दुपारी वसतिगृहाच्या रुम नं. २५ मध्ये बोलावून पुन्हा मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या अभिषेकने कशीबशी सुटका करून घेत चंद्रपूर जिल्ह्यातील गाव गाठले.पाच दिवसानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर अभिषेक आई-वडिलांना घेऊन महाविद्यालयात आला. अधिष्ठाता डॉ.अशोक राठोड यांना लेखी तक्रार दिली. मात्र राठोड यांनी दखल न घेता ‘नंतर भेटा’, असे सांगितल्याचे अभिषेकच्या पालकांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ.राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.