शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

यवतमाळच्या बचतगटांची उत्पादने देशपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:55 IST

बचतगटांनी तयार केलेली उत्पादने दर्जेदार असली तरी ही उत्पादने स्थानिकस्तरापुरतीच मर्यादित आहेत. यामुळे बचतगटांचे उद्योग फारसे वाढले नाही. मार्केटिंगचा अभाव हा उद्योगाच्या विकासातील मोठा अडसर मानला जातो.

ठळक मुद्देथेट अ‍ॅमेझॉनशी करार : महिला आर्थिक विकास महामंडळाचा पुढाकार, एका क्लिकवर घरपोच सेवेचे आज लॉचिंग

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बचतगटांनी तयार केलेली उत्पादने दर्जेदार असली तरी ही उत्पादने स्थानिकस्तरापुरतीच मर्यादित आहेत. यामुळे बचतगटांचे उद्योग फारसे वाढले नाही. मार्केटिंगचा अभाव हा उद्योगाच्या विकासातील मोठा अडसर मानला जातो. यावर मात करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने अ‍ॅमेझॉनशी करार केला आहे. गुरूवारी २५ आॅक्टोबर रोजी बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे एका क्लिकवर या उत्पादनाचे लाँचिंग करणार आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात एक लाख १६ हजार बचतगटांची निर्मिती करण्यात आली आहे. या बचतगटाच्या माध्यमातून राज्यभरात १३ लाख ८७ हजार महिला एकत्र आल्या आहेत. यामधील साडेपाच लाख महिलांनी बचतगटांचे गृह उद्योग सुरू केले आहेत. त्याकरिता बँकांनी दोन हजार १२२ कोटी रूपयांचे कर्ज बचतगटांना दिले आहेत. बचतगटांना वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या माध्यमातून महिला शेती, कृषी सेवा केंद्र आणि गृहउद्योगाची उभारणी केली आहे.महिलांनी उत्पादित केलेल्या या वस्तूंची बाजारात कुठेही तोड नाही. मात्र या वस्तूंचे पाहिजे तसे मार्केटिंग झाले नाही. यामुळे ही उत्पादने गावापुरते मर्यादित राहिले आणि बचतगटाच्या प्रदर्शनापर्यंतच टिकले. त्यानंतरच्या कार्यकाळात या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविताच आल्या नाही. यामुळे बचतगटांचा व्यवसाय मर्यादित राहिला.यावर मात करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने अ‍ॅमेझॉन कंपनीशी करार केला आहे. अ‍ॅमेझॉनच्या सहेली कॉर्नरवरून या उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. त्यामध्ये स्थानिक जिल्ह्यामध्ये ज्या वस्तूची निर्मिती अधिक होते. इतर ठिकाणी त्याची मागणी असते. मात्र ग्राहकांना त्या उपलब्ध होत नाही. या धावपळीत ग्राहकांना त्या वस्तू घरपोच उपलब्ध करवून दिल्या जाणार आहे. त्याकरिता बचतगटाच्या १५० वस्तू या संकेतस्थळावर ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू आणि हॅन्डमेड वस्तूंचा समावेश आहे. काही खाद्यपदार्थही त्यामध्ये नोंदविण्यात आले आहे.तूरडाळ, नाचणी आणि टसर सिल्कयवतमाळची तूर डाळ, हळद पावडर, भंडारा जिल्ह्यातील टसर सिल्क, जळगावचे केळी वेफर्स, मोहचे लाडू, रत्नागिरीचे नाचणी बिस्कीटे, नाचणी पावडर, सिंधुदुर्गचे काजू , कोकम या सारख्या अनेक वस्तू क्लिकवर मिळणार आहे. यामुळे बचतगटांचे आर्थिक स्थैर्य वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे.महिला बचतगटांना सक्षम करण्यासोबत त्यांची उत्पादने घराघरात पोहचावी म्हणून माविम सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यातूनच अ‍ॅमेझॉनशी करार करण्यात आला आहे. यामुळे बचतगटांची चळवळ मजबूत होणार आहे.- महेश पाखरे,सहायक व्यवस्थापकमहिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई