शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ नगरपरिषद आता २८ प्रभागांची

By admin | Updated: May 14, 2016 02:17 IST

आठ ग्रामपंचायतीच्या हद्दवाढीनंतर यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे.

डिसेंबरमध्ये निवडणुका : अनेकांना नगराध्यक्ष पदाचे डोहाळेयवतमाळ : आठ ग्रामपंचायतीच्या हद्दवाढीनंतर यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. मतदार संख्येच्या तुलनेत यवतमाळात आता २८ प्रभाग राहणार आहे. दरम्यान जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने अनेक दिग्गजांना त्याचे डोहाळे लागले आहे. यवतमाळ नगर परिषद क्षेत्राची नुकतीच हद्दवाढ झाली. या नगरपरिषदेत शहरालगतच्या वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, भोसा, मोहा, उमरसरा, डोळंबा या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे शहराची लोकसंख्या २ लाख ५२ हजार एवढी झाली आहे. आता यवतमाळात नव्या प्रभाग रचनेनुसार २८ प्रभाग राहणार आहे. तर २ लाख ५२ हजार लोकसंख्येतून नगराध्यक्षाला निवडून द्यावयाचे आहे. शहरात ग्रामीण भागात समाविष्ठ झाल्याने नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे. अशा स्थितीत सत्ताधारी भाजपा, राष्ट्रवादी आणि विरोधी बाकावर असलेले काँग्रेस, बसपा व शिवसेना या प्रमुख पक्षांचा उमेदवार कोण हे महत्वाचे ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या थेट निवडणुकीबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा राहणार, आरक्षण कोणते निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र थेट निवडणूक लढविणाऱ्यांची अचानक वाढलेली सक्रियता सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे. आयोगाने निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत जून महिन्यांपासून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात करण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र आता राज्य सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रभाग रचना प्रक्रियेतही फेरबदल करण्यात येणार की जुन्याच चक्राकार पद्धतीने प्रभाग रचना होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. प्रभाग पद्धतीत पूर्वी सदस्य संख्या चार होती. त्यात दोन महिला आणि दोन पुरुष अशी विभागणी करण्यात आली होती. आता दोनच सदस्यांचा एकच प्रभाग असल्याने नगर परिषदांमध्ये प्रभागांची संख्या दुपटीने वाढणार आहे. अनेकांना ही पद्धत राजकीय पक्षांसाठी सोईची वाटत आहे. तर काहींचा सूर यामुळे पुन्हा अपक्षांना वाव मिळेल, असा आहे. एका प्रभागात एक जागा आरक्षित व दुसरी जागा सर्वसाधारण ठेवण्यात येईल, असाही कयास आहे.नगरसेवकातून नगराध्यक्षांची निवड केवळ अडीच वर्षासाठी केली जात होती. त्यानंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण बदलविले जात होते. आता नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार असल्याने त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा राहणार हे गुलदस्त्यात आहे. अडीच वर्षासाठी काढण्यात आलेले नगराध्यक्षांचे आरक्षण कायम ठेवले जात की फेरबदल होतो याकडे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)