यवतमाळमधील कोट्यवधींचा भूखंड घोटाळा, सातवा आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 14:27 IST2018-08-20T14:25:46+5:302018-08-20T14:27:28+5:30
यवतमाळ शहरातील कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यात सोमवारी सातवा आरोपी गजाआड झाला आहे. शिवा तिवारी असे आरोपीचे नाव आहे.

यवतमाळमधील कोट्यवधींचा भूखंड घोटाळा, सातवा आरोपी गजाआड
यवतमाळ : यवतमाळ शहरातील कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यात सोमवारी सातवा आरोपी गजाआड झाला आहे. शिवा तिवारी असे आरोपीचे नाव आहे. तो जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कर्मचारी आहे. शिवाय ‘एसआयटी’ने एलआयसी चौकातील साई झेरॉक्स व इंटरनेट सेंटरला सील ठोकले. ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या भूखंड घोटाळ्यात आतापर्यंत सात गुन्हे नोंदविले गेले. दोन दिवसांपूर्वी न्यायालय रोडवरील प्रवीण झेरॉक्सही सील करण्यात आले होते. बनावट मालक उभा करून भूखंड परस्पर आपल्या नावे करणे व अशा भूखंडांवर बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज उचलून हा घोटाळा केला गेला. या घोटाळ्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) स्थापन केली आहे. या घोटाळ्याचे सूत्रधार मात्र मुंबई, युरोपात फरार झाल्याची माहिती आहे.