गुंड ‘येडा’वर महिला पोलीस ठरल्या भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:43 IST2018-08-20T22:43:18+5:302018-08-20T22:43:45+5:30
जामनकरनगर परिसरात धारदार चाकूच्या धाकावर दहशत पसरविणाऱ्या गुंड सचिन छगन राठोड उर्फ सचिन येडा याला टोळी विरोधी पोलीस पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले.

गुंड ‘येडा’वर महिला पोलीस ठरल्या भारी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जामनकरनगर परिसरात धारदार चाकूच्या धाकावर दहशत पसरविणाऱ्या गुंड सचिन छगन राठोड उर्फ सचिन येडा याला टोळी विरोधी पोलीस पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. या गुंडावर सदर पाच महिला पोलीस भारी ठरल्या.
प्रतीक्षा केने, प्रियंका ढोके, रुख्सार शेख, वैशाली मेंढे, विभावरी ढवस, मिनाक्षी जंगले अशी या पोलीस दलातील रणरागिणींची नावे आहेत. या महिला पोलिसांनी पुरुष सहकाऱ्यांची वाट न पाहता स्वत:च पुढाकार घेत या गुंडाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चाकू जप्त करून अवधूतवाडीत गुन्हा नोंदविला.