कोरोनाच्या भीतीने महिलांना कामावर येण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:29+5:30

डोर्लीपुरा व परिसर २७ एप्रिलपासून २५ मेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला होता. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी होती. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असल्याने नागरिकांनी प्रशासनालाही पूर्णपणे सहकार्य केले. आता प्रतिबंध हटल्यानंतर या भागातील महिला व पुुरूष आपल्या कामावर जायला निघाले आहे. मात्र तेथे त्यांना कोरोनाबाधित क्षेत्रातील म्हणून कामावर येण्यास मज्जाव करत आहे.

Women banned from coming to work for fear of corona | कोरोनाच्या भीतीने महिलांना कामावर येण्यास बंदी

कोरोनाच्या भीतीने महिलांना कामावर येण्यास बंदी

googlenewsNext
ठळक मुद्देरोजगाराचा प्रश्न : डोर्लीपुरा येथील महिलांची जिल्हा कचेरीवर धडक, शासकीय मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. डोर्लीपुरा परिसर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सील केला होता. आता तो रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळला आहे. त्यानंतरही या भागातील महिलांना कामावर येण्यास मज्जाव केला जात आहे. हीच समस्या घेवून महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
डोर्लीपुरा व परिसर २७ एप्रिलपासून २५ मेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला होता. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी होती. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असल्याने नागरिकांनी प्रशासनालाही पूर्णपणे सहकार्य केले. आता प्रतिबंध हटल्यानंतर या भागातील महिला व पुुरूष आपल्या कामावर जायला निघाले आहे. मात्र तेथे त्यांना कोरोनाबाधित क्षेत्रातील म्हणून कामावर येण्यास मज्जाव करत आहे. रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या या भागात प्रचंड आहे. महिनाभर रोजगार नसल्याने या कुटुंबांकडे जमा असलेली रक्कमही खर्च झाली आहे. आता दोन वेळच्या जेवणासाठी काम केल्याशिवाय पर्याय नाही . मात्र कामावर येण्यास बंदी घातल्याने डोर्लीपुरा परिसरात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गंभीर समस्या घेवून नगरसेवक पल्लवी रामटेके यांच्या नेतृत्त्वात महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. रोजगार नसल्याने परिसरातील कुटुंबांना शासनाकडून मदत करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Women banned from coming to work for fear of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.