घरी न परतलेल्या पतीचा शोध घेत निघाली पत्नी; रेल्वे ट्रॅकवर पोहचताच तिचे आभाळ फाटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:45 IST2026-01-06T13:43:41+5:302026-01-06T13:45:04+5:30
Yavatmal : घाटंजी मार्गावरील बोथगव्हाणजवळ निर्माणाधीन रेल्वे ट्रॅक परिसरात सोमवारी सकाळी एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस तेथे पोहोचले.

Wife sets out in search of husband who didn't return home; Her heart breaks as soon as she reaches the railway tracks
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घाटंजी मार्गावरील बोथगव्हाणजवळ निर्माणाधीन रेल्वे ट्रॅक परिसरात सोमवारी सकाळी एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस तेथे पोहोचले.
यापूर्वीच मृताची पत्नी पतीच्या शोधात फिरत असताना तेथे आली. तिने दिलेल्या तक्रारीवरून चापडोह येथील युवकाविरोधात अवधूतवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेतले. जानराव विठोबा मैद (५६) रा. सावरगड असे मृताचे नाव आहे. जानराव हे यवतमाळातील डॉक्टरकडे घरकामाला होते. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ या वेळेत काम करून ते घरी परत येत होते. सावरगड ते यवतमाळ असा नियमित सायकलने प्रवास करीत होते. रविवारी जानराव घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी गीताबाई या पतीचा फोटो घेऊन शोध घेत घरून निघाल्या. त्यांना बोथगव्हाण येथील काही नागरिकांनी रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. तेथे जाऊन गीताबाईनी पाहणी केली असता तो मृतदेह जानराव मैद यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना देण्यात आली.
रविवारी रात्री जानराव मैद यांच्यासोबत संशयित प्रफुल्ल गजानन साखरकर रा. चापडोह हा होता, अशी माहिती मिळाली. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी प्रफुल्ल साखरकर याला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांपुढे गुन्हा कबूल करीत जानरावला दगडाने मारहाण करून ठार केल्याचे सांगितले.
दोन दिवस डांबून युवतीवर अत्याचार
- शहरातील तलावफैल परिसरात दोन दिवस डांबून ठेवत आरोपीने युवतीवर अत्याचार केला, तर मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिस ठाण्यात दिली होती.
- याच दरम्यान, दोन दिवसांनी कशीबशी सुटका करून घरी परतलेल्या मुलीने आपबिती सांगितली. त्यावरून नराधमाविरोधात पोलिसांनी कलम ६४ (१), ६४ (२) (आय), ६४ (२) (के), ६४ (२) (एम) भारतीय न्यायसंहितेनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.
- स्वप्निल कुमरे (२०) असे आरोपीचे नाव आहे. त्याने ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पीडितेला ओढत नेऊन एका घरात डांबले. तिथे तुझ्यासोबत लग्न करतो, असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला. ५ जानेवारी रोजी सकाळी पीडितेची आरोपीने सुटका केली.
- पीडिता घरी पोहोचल्यानंतर तिने आईजवळ आपबिती सांगितली. त्यावरून शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुजाता मनवर यांच्याकडे देण्यात आला आहे.