शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी लाखो विद्यार्थी पण अर्ज केवळ ५३ हजार विद्यार्थ्यांनीच का भरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:36 IST

Yavatmal : ३० नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीने वाढविला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती दिली जाते. पूर्वी या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करावे लागत होते. आता यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली; मात्र त्यात तांत्रिक अडचणी असल्याने शाळांना हे अर्जच भरता आले नाहीत. राज्यभरात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी लाखोंच्या घरात असताना, राज्यात केवळ ५३ हजार अर्जाची नोंद झाली आहे. ३० नोव्हेंबरला अर्जाची अंतिम मुदत आहे. दोन दिवस बाकी असताना हजारो विद्यार्थी या प्रक्रियेच्या बाहेर आहेत.

या शिष्यवृत्तीसाठी शाळांनी अर्ज भरल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करायचे आहेत. शाळांनी हे अर्ज गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यांनतर समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचे होते. प्रत्यक्षात ही प्रक्रिया अनेक शाळांकडून झाली नाही. जे अर्ज ऑनलाइन दाखल झाले ते पुढील दोन दिवसांत समाजकल्याण विभागाकडे दाखल होणार काय? हा प्रश्न आहे. यामुळे या विद्यार्थ्यांपुढे अडचणीचा डोंगर उभा ठाकला आहे. 

अशी आहे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीमॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविली जाते. यामध्ये अनुसूचित जातीचे विद्यार्थी असलेल्या वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. यामध्ये १० महिन्यांसाठी विद्यार्थ्यांना ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर, अनुसूचित जातीच्या ८ ते १० च्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक हजार रुपये शिष्यवृत्ती निश्चित केली आहे.

केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ९ वी १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य वाटा मिळून तीन हजार ५०० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. सफाई कामगारांच्या पाल्यांना १ ते १० पर्यंत शिक्षण घेण्यासाठी ३५०० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय ५ ते ७ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन क्रमांकासाठी ५०० रुपये शिष्यवृत्ती निश्चित केली आहे. तर, आठ ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १००० रुपयांची गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते.

ही शिष्यवृत्तीत नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या

अहिल्यानगर २३९१, अकोला ३२०३, अमरावती ३८८५, बीड ११३३, भंडारा २७७२, बुलढाणा १२५१, चंद्रपूर १७४३, छत्रपती संभाजीनगर १८१६, धाराशिव ३१५०, धुळे ७९०, गडचिरोली ७०९, गोंदिया ६५४, हिंगोली ७४९, जळगाव २००३, जालना १०३५, कोल्हापूर १३८१, लातूर १७५०, मुंबई १- ३६, मुंबई २ - ११९०, नागपूर १७७०, नांदेड १३५६, नंदूरबार ७९, नाशिक ४३२३, पालघर १५२, परभणी ७२९, पुणे १००८, रायगड ७२, रत्नागिरी ९६२, सांगली २९९१, सातारा २५४०, सिंधुदुर्ग ६९९, सोलापूर २१३०, ठाणे १२४२, वर्धा ११४१, वाशिम १२४६, यवतमाळ १४१९, असे एकूण ५३ हजार ५०० विद्यार्थी आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra: Lakhs of students miss pre-matric scholarship due to online issues.

Web Summary : Only 53,000 Maharashtra students applied for pre-matric scholarships due to technical online application issues. Many schools struggled with the process before the November 30 deadline, potentially impacting numerous Scheduled Caste students.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रYavatmalयवतमाळSchoolशाळाScholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षण